Girish Mahajan : सख्ख्या भाच्याला मंत्री गिरीश महाजन यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले, एकनाथ खडसे यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

जळगाव : माझ्या सख्ख्या भाच्याला मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात काढावे लागले असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात खडसे यांचे भाचे राजू पाटीलला पोलिसांनी अटक केली होती .बिद्रे प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर याच्या मोबाईल संभाषणाचे रेकॉर्ड पोलिसांना प्राप्त झाल्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अश्विनी बिद्रे या बेपत्ता झाल्या व त्यांचे शेवटचे असलेले लोकेशन नंतर त्याच वेळी अभय कुरुंदकरने ज्ञानदेव पाटील याला संपर्क केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर अश्विनी बिद्रे यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले.

यावर खडसे म्हणाले,कुरुंदकर याच्या सोबत बोलण्यावरून आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्या आले, त्याला सात वर्ष विनाकारण कारागृहात काढावे लागले. निर्दोष सुटून आल्याच्या नंतर त्याने कारागृहाच्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण कैद्यांना दिले जात असल्याचं आपल्याला सांगितले.
नाशिकच्या पालकमंत्री पदावरूनही यांनी पुन्हा नाव न घेता गिरीश महाजन यांच्यावर खोचक टीका केली आहे पालकमंत्री पदाची आवश्यकता नसेल सर्व ठिकाणचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतले पाहिजे. पालकमंत्री पदासाठी मी मागे सुद्धा म्हटलं होतं की का म्हणून लोचटपणा आणि लाचारी करावी. त्या जिल्ह्यात चार चार मंत्री असताना बाहेरच्या जिल्ह्यातल्या मंत्राने मला पालकमंत्री करा असा आग्रह धरणं म्हणजे काहीतरी स्वार्थ आहे हजारो कोटी रुपयांचं बजेट कुंभमेळाचा आहे. कुंभमेळ्याच्या बजेट मधला काहीतरी मलिदा मला मिळावा, म्हणून पालकमंत्री करा असा काहींचा आग्रह आहे. Girish Mahajan

Minister Girish Mahajan framed his close nephew in a false crime, alleges Eknath Khadse

महत्वाच्या बातम्या