Gopinath fort : गोपीनाथ गडावर 11 वर्षांनंतर धनंजय आणि पंकजा मुंडे एकत्र

विशेष प्रतिनिधी

बीड: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे-धनंजय मुंडे 11 वर्षानंतर गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला एकत्र येत आहे. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष असल्याने त्या पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिले असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. Gopinath fort

पंकजा मुंडे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा आता मित्र पक्ष आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या सर्व नेत्यांना आम्ही निमंत्रण दिले आहे. धनंजय मुंडे यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आहे. धनंजय मुंडे हे तर माझे भाऊच आहेत. त्यामुळे तो नक्कीच या कीर्तनाला उपस्थित राहील.

गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यावर परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 18 एकर जागेवर गोपीनाथ गड उभारण्यात आला. या परिसरात गोपीनाथ मुंडेंचा पूर्णकृती पुतळाही उभारण्यात आला. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते हा गोपीनाथ गडाचं लोकार्पण करण्यात आलं होतं.

रामटेक हा बंगला मला राहण्यासाठी मिळाला आहे. वास्तविक मी 2014 मध्येच माझ्यासाठी हा बंगला मागितला होता. मात्र, तो वरीष्ठ मंत्र्यांचा बंगला असल्याने मला मिळाला नव्हता. मात्र यावेळी मला हा बंगला मिळाला त्यावेळी फार मोठे पारितोषिक मला मिळाले असल्याचा आनंद वाटतोय. इतिहास घडवण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. मुंडे साहेब यांच्या नंतर तो बंगला मला मिळाला आहे. देशात असे एखादेच उदाहरण असेल. हा बंगला एका विचारांचे, जबाबदारीचे प्रतीक असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. Gopinath fort

Dhananjay and Pankaja Munde together after 11 years at Gopinath fort

महत्वाच्या बातम्या