Monsoon arrives : पुणे व मुंबईत मान्सून दाखल, पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा इशारा
पुणे व मुंबईत मान्सून दाखल झाला असून पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाचे (IMD) पुणेचे शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांच्या माहितीप्रमाणे, काल तळ कोकणात मान्सून दाखल झाला असून आज मुंबईत देखील मान्सून पोहोचला आहे.











