Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : सुनेचा छळ पाप, ते येथे झाले आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संताप

आज 21व्या शतकात जेव्हा मुली आणि सूनांमध्ये कोणताही फरक करणं चुकीचं आहे. सुनेला अशा प्रकारची वागणूक देणे हे अतिशय पाप आहे. ते या ठिकाणी झालं आहे. सध्या याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे, असा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर बोलताना केला.

vaishnavi hagawane case
पुणे

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणचे उद्योग, स्पाय कॅमेऱ्याने पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेल्या निलेश चव्हाणविरोधात आणखी गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाण याने आपल्या पत्नीबरोबरच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरून रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Dowry Free Maharashtra
पुणे

Dowry Free Maharashtra : हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी २२ जूनपासून राज्यव्यापी मोहीम

राज्यातील पिंपरी येथील वैष्णवी कस्पटे-हगवणे हिच्या दुर्दैवी हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असतानाच, या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘हुंडामुक्त महाराष्ट्र – हिंसामुक्त कुटुंब’ या राज्यव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. येत्या २२ जून २०२५ पासून पुण्यातून या मोहिमेची सुरुवात होणार असून वर्षभर विविध टप्प्यांत राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे.

shrikant shinde
देश-विदेश

Shrikant Shinde : दहशतवादविरोधी मोहीमेत संयुक्त अरब अमिरातीचे भारताला समर्थन, श्रीकांत शिंदे यांची माहिती

दहशतवादविरोधी मोहीमेत भारताच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण समर्थन देऊ, अशी ग्वाही संयुक्त अरब अमिरातच्या (यूएई) मंत्र्यांनी भारताच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला दिली.

Rupali Chakankar
पुणे, विश्लेषण

Rupali Chakankar राज्य महिला आयोगामुळेच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला फुटली वाचा, रुपाली चाकणकर यांचा दावा

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयोगाकडे तक्रार नव्हती. पण आयोगाने स्वतः सुमोटो दाखल करून या घटनेला वाचा फोडली असा दावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

Chhagan Bhujbal
मुंबई

Chhagan Bhujbal : धनंजय मुंडेंचं खातं छगन भुजबळांच्या पारड्यात

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे. यांनी मंगळवारी राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली होती.

Neelam Gorhe
मुंबई

Neelam Gorhe : प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ सरकारने उभे राहावे, डॉ. नीलम गोऱ्हे यांची अपेक्षा

महिन्याला दीड हजार रुपये देणे हीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा आहे. कोणत्याही महिलेला कौटुंबिक छळाचा सामना करावा लागत असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

Harshwardhan Sapkal
मुंबई

Harshwardhan Sapkal : राष्ट्रवादी गुंडांची टोळी, अजित पवार टोळीचे आका आहेत का? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का सळ सळतं? राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

नरेंद्र मोदी तुम्ही पोकळ भाषणं देणं थांबवा, तुमचं रक्त केवळ कॅमेऱ्यासमोरचं का सळसळतं, असा सवाल काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या बिकानेर येथील भाषणानंतर लगावला आहे.

Uttar Pradesh ATS
देश-विदेश

Uttar Pradesh ATS : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला उत्तर प्रदेश एटीएसने केली अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला उत्तर प्रदेश एटीएसने वाराणसीमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. पाकिस्तान पुरस्कृत भारतविरोधी संघटनांच्या तो संपर्कात होता. या संघटनांना त्याने भारतातील काही ठिकाणांची माहिती दिली.

Dr. Jalider Supekar
पुणे

Dr. Jalider Supekar : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या चाैकशीची मागणी

पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत. दमानियांनी त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोपांवर सुपेकरांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : माओवाद माेजताेय शेवटच्या घटका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

माओवाद्यांचा देशातील पहिल्या क्रमांकाचा नेता आहे बसव राजू याचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे. अनेक माओवादी मारले जात आहेत. अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. आता माओवाद हा शेवटच्या घटका मोजत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.