Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Tejashwi Ghosalkar
मुंबई

Tejashwi Ghosalkar : तेजस्वी घाेसाळकर म्हणाल्या, गद्दारी केलेली नाही, मी अजून ठाकरेंसाेबतच

भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या माजी नगरसेविका तेजस्वी घाेसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. अजून आपण ठाकरेंसाेबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Colonel Sophia Qureshi
देश-विदेश

Colonel Sophia Qureshi : कर्नल साेफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मंत्र्यावर गुन्हा, न्यायालयाने स्वत:हून घेतली दखल

ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी असलेल्या कर्नल साेफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे मध्य प्रदेशातील भाजप सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शाह यांच्या या विधानाची दखल घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रात्री 11.15 च्या सुमारास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उद्या सकाळी सर्वात आधी न्यायालय याच प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

Ajit Pawar
मुंबई

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही, अजित पवार यांचा खुलासा

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दाेन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना यामध्ये तथ्य नसल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत केला

Devendra Fadnavis
देश-विदेश, महाराष्ट्र

Devendra Fadnavis भारतीय सैन्यांची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवून दिली, देवेंद्र फडणवीस यांनी केले काैतुक

भारतीय सैन्यांची ताकद काय आहे? हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण दाखवून दिले आहे. “हमें कोई झुका नहीं सकता, हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, ना बिकेंगे और ना थकेंगे, अशा प्रकारची भारतीय सेनेची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सर्वांना कळली असेल

Naxalites
देश-विदेश

‘नक्षलमुक्त भारता’च्या दिशेने पाऊल; छत्तीसगड-तेलंगणा सीमावर्ती कर्रेबुट्टलू डोंगरात ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा

‘नक्षलमुक्त भारत’ या संकल्पनेच्या दिशेने भारताने मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगड व तेलंगणा सीमावरील कर्रेबुट्टलू डोंगर परिसरात झालेल्या इतिहासातील सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Operation Sindoor
देश-विदेश

Operation Sindoor ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानलाच नव्हे चीनलाही दणका, पाकिस्तानची चिनी हवाई संरक्षण यंत्रणा २३ मिनिटांत जॅम

पाकिस्तानातल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेमुळे संपूर्ण जगाला भारताच्या लष्करी क्षमतेचा प्रत्यय आला.

Sophia Qureshi
देश-विदेश

Sophia Qureshi कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत भाजप मंत्री विजय शाह यांचे वादग्रस्त वक्तव्य; संतापाची लाट

ऑपरेशन सिंदूरसारख्या ऐतिहासिक मोहिमेची जगासमोर माहिती मांडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Chandrakantdada Patil
मुंबई

Chandrakantdada Patil : महाविद्यालयीन युवकांनी व्हावे सिव्हिल डिफेन्स वॉरिअर, माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन क्षेत्रांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास युवकांद्वारे रक्तदान करून, देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी,राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी.असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

महाराष्ट्र

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत 32 पूल महारेलनी पूर्ण केले आहेत

महाराष्ट्र

IPS officer राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रवींद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे.