Colonel Sophia Qureshi : कर्नल साेफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मंत्र्यावर गुन्हा, न्यायालयाने स्वत:हून घेतली दखल

Colonel Sophia Qureshi : कर्नल साेफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मंत्र्यावर गुन्हा, न्यायालयाने स्वत:हून घेतली दखल

Colonel Sophia Qureshi

विशेष प्रतिनिधी

भोपाळ : Colonel Sophia Qureshi  ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी असलेल्या कर्नल साेफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे मध्य प्रदेशातील भाजप सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शाह यांच्या या विधानाची दखल घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रात्री 11.15 च्या सुमारास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उद्या सकाळी सर्वात आधी न्यायालय याच प्रकरणाची सुनावणी करणार आहे.Colonel Sophia Qureshi

केंद्र सरकारने कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचा भाग असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांची देशभर प्रशंसा होते आहे. मात्र, त्याच कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत शाह यांनी आक्षेपार्ह विधान केले.

इंदूर जिल्ह्यातील मानपूर भागातील रायकुंडा गावात आयोजित हलमा कार्यक्रमाला उपस्थित असलेले कॅबिनेट मंत्री विजय शाह म्हणाले होते की, ज्यांनी आमच्या महिलांच्या कुंकवावर घाला घातला, ज्यांनी आमच्या पर्यटकांना मारले, आम्ही त्यांच्याच बहिणीला त्यांच्याकडे पाठवले आणि त्यांना ठार मारले. दहशतवाद्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले आणि मोदींनी त्यांच्या बहिणीला आमच्या विमानातून त्यांच्या घरी पाठवून त्यांना वाईट वागणूक दिली. आणि इशारा दिला की, जर तुम्ही आमच्या बहिणींना विधवा केले, तर तुमच्या समुदायाची बहीण येऊन तुम्हाला धडा शिकवेल. विजय शाह यांच्या या विधानाचा संबंध थेट लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासोबत जोडला जात असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसत आहे. शाह यांच्या याच वक्तव्याची दखल घेत उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

विजय शाह यांच्या विधानाची स्वतः दखल घेत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने विजय शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्या. अतुल श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मध्य प्रदेश पोलीस महासंचालकांना हे आदेश दिले आहेत. न्यायालयाचे म्हणणे आहे की, अशा वक्तव्यानंतर विजय शाह यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा होता. यासोबतच राज्याचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांना देखील न्यायालयाने आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल व्हायलाच हवा.

याच मुद्द्यावरून राजकारण देखील पेटले आहे. मध्य प्रदेश कॉंग्रेसचे प्रमुख जीतू पटवारी यांनी मंत्री विजय शाह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मध्य प्रदेशातील एका मंत्र्याने लष्करातील अधिकारी आणि बहिणींचा अपमान केला आहे. जर त्यांना 24 तासात पदावरून हटवले नाही तर आम्ही देशातील सगळ्या पोलीस ठाण्यात विजय शाह यांच्याविरोधात तक्रार करू, असा इशारा दिला आहे.

इंदौरच्या महिला कॉंग्रेस नगरसेवक यशस्वी अमित पटेल यांनी विजय शाह यांचे तोंड काळे करणाऱ्यासाठी 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रसंगात अशा पद्धतीचे राजकारण करणे मंत्र्यांना शोभत नाही. अशा मंत्र्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

Minister booked for making objectionable statement about Colonel Sophia Qureshi, court takes suo motu cognizance

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023