Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

tanisha bhise
मुंबई

Tanisha Bhise : तनिषा भिसे यांच्या जुळ्या मुलींसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 24 लाख रुपयांची मदत

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलपणामुळे प्राण गमवावा लागलेल्या तनिषा भिसे यांच्या जुळ्या मुलींच्या उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 24 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. सरकारने हे पैसे संबंधित रुग्णालयाच्या खात्यात वर्ग केले असून, त्यातून या मुलींवर उपचार केले जात आहेत.

Ajit Pawar
मुंबई

Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री हाेण्याची इच्छा पुन्हा व्यक्त केल्याने राजकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार भाजपासोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले, तर भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून कदाचित भविष्यात होतील. हे त्यांना स्वतः अमित शाह यांनी सांगितले आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Shraddha Kapoor
मुंबई

Shraddha Kapoor : स्मार्टफोन असलेला कोणीही होऊ शकतो निर्माता, श्रद्धा कपूर म्हणते भारतात डिजिटल आशय निर्मितीचा नवा अध्याय

इस्टाग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आशय निर्मितीचे लोकशाहीकरण होत आहे. आज ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे, तो कोणीही सर्जक आणि निर्माता होऊ शकतो. भारताच्या सृजनशील वारशामुळे भारतीय युवा पिढीसाठी हा काळ ‘सुवर्णसंधी’ असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने व्यक्त केले.

Lairai Devi Stampede
देश-विदेश

Lairai Devi Stampede : गोव्यातील लयराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन सात भाविकांचा मृत्यू

गोव्यातील शिरगाव येथे प्रसिद्ध असलेल्या लयराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी (Lairai Devi Stampede)  झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास मंदिरात ही घटना घडली. या घटनेमध्ये सात भाविकांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. लयराई देवीच्या यात्रेला शुक्रवारपासून (ता. 2 मे) सुरुवात झाली आहे. पण यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे या यात्रेला गालबोट लागले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जखमींमधील काही भाविकांची प्रकृती चिंताजनक आहे.

Pahalgam attack
देश-विदेश

Pahalgam attack : पहलगाम हल्ल्याआधी हामास व पाकपुरस्कृत दहशतवाद्यांची गुप्त युती; दिल्लीत रक्तपाताचा इशारा, काश्मीरला फोडण्याचा कट उघड

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना आणि पॅलेस्टिनी संघटना हामास यांच्यातील नव्या युतीचा भाग होता, असे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी उघड केले आहे.

Devendra Fadanvis
मुंबई

Devendra Fadanvis : परदेशी शिक्षणाचे स्वप्न होणार पूर्ण; ‘एज्यु सिटी’साठी आठ हजार कोटींचे करार, चित्रपटसृष्टीलाही नवी चालना

महाराष्ट्र सरकारच्या दूरदृष्टीने आकाराला येणाऱ्या ‘एज्यु सिटी’ प्रकल्पामुळे परदेशी शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न आता देशातच पूर्ण होणार आहे. व्हेज जागतिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण परिषदेत एकूण ८,००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoUs) साकारले गेले. शिक्षण, चित्रपटसृष्टी आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमी यामध्ये महाराष्ट्राची आघाडीची भूमिका या करारांमुळे अधोरेखित झाली आहे.

Charanjit singh channi
देश-विदेश

Charanjit singh channi : काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री यांची मुक्ताफळे, म्हणे बालाकोट एअर स्ट्राईक कुणी पाहिलं का?’

पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट एअर स्ट्राइक करून भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. मात्रकाँग्रेसचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी बालाकोट एअर स्ट्राईकबाबत संशय व्यक्त करत पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : नवी मुंबईत उभारणार ‘AI एज्युसिटी’, महाराष्ट्र बनणार ग्लोबल कंटेंट हब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

जागतिक मनोरंजन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापराचा झपाट्याने वाढता कल पाहता, भारताला या क्षेत्रात आघाडी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. नवी मुंबई येथे ‘AI एज्युसिटी’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान आधारित शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

CM Fadnavis
महाराष्ट्र

CM Fadnavis : पुण्याजवळ बायोकॉनचा इन्सुलिन प्रकल्प; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सहकार्याची हमी

महाराष्ट्रातील औषधनिर्मिती क्षेत्रात मोठी झेप घेत, देशातील आघाडीची जैवतंत्रज्ञान कंपनी बायोकॉन लिमिटेड पुण्याजवळ इन्सुलिन उत्पादन प्रकल्प उभारण्यास उत्सुक आहे. बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मजुमदार-शॉ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विशेष बैठक झाली. यावेळी फडणवीस यांनी बायोकॉनच्या प्रस्तावाचे स्वागत करत राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

देश-विदेश

IMF पहलगाम हल्ल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका; आयएमएफ व इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना पाकिस्तानला दिलेल्या कर्जाचा आढावा घेण्याची मागणी

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात राजनैतिक आणि आर्थिक पातळीवर कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

देश-विदेश

IIT Gandhinagar आयआयटी गांधीनगरच्या डीपफेथ‘ प्रकल्पावरून वाद; इस्लामिक थीमवर पीएचडी संशोधनामुळे टीका

आयआयटी गांधीनगरमधील ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस (HSS) विभाग सध्या वादात सापडला आहे.

Bilawal Bhutto
देश-विदेश

Bilawal Bhutto : होय, आम्ही दिला दहशतवाद्यांना आश्रय; बिलावल भुट्टोंची कबुली

भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे जगभरात अनेकदा बोलले गेले, मात्र प्रत्येकवेळी पाकिस्तानने हे आरोप फेटाळले. मात्र आता, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीच आपल्या देशाच्या दहशतवादाशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे.