Devendra Fadnavis जातीनिहाय जनगणनेमुळे सामाजिक न्यायाचे नवे पर्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयामुळे समाजिक न्यायाचे नवे पर्व सुरु झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयामुळे समाजिक न्यायाचे नवे पर्व सुरु झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
जातनिहाय जनगणनेमुळे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल आणि या देशाचं वस्त्र नेमकं कुठल्या धाग्यांनी विणले गेले आहे, हे स्पष्टपणे कळून येईल.
केंद्र सरकारने घेतलेल्या संपूर्ण देशभरात जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत करत जाहीर पाठिंबा दिला आहे. कोणत्या जातीने ओबीसी आरक्षण खाल्ले ते समजेल असे ते म्हणाले.
पहलगाम तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य जनगणनेतच जातनिहाय जनगणना केली जाईल. यापूर्वी 1931 साली जातीय जनगणना झाली होती.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी काँग्रेसने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर ‘गायब’ शीर्षकाची एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. मात्र देशभरातून झालेल्या तीव्र निषेधामुळे काँग्रेसला अखेर ही पोस्ट हटवावी लागली.
देशात संतापाचे वातावरण असताना काही राजकीय पक्ष घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप करत, बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला थेट इशारा दिला आहे. “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जी पावले उचलली आहेत, त्याला सर्व पक्षांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा. जर घाणेरडं राजकारण थांबवले नाही, तर बसप रस्त्यावर उतरेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारला लोणावळ्यातील जयचंद चौकामध्ये अपघात झाला. त्यांची आर्टिका गाडी बाजारपेठेत जात असताना एका दुचाकीस्वाराने गाडीला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
मी माझं म्हणणं मांडलं आहे. माझं मत आवडलं असेल तर त्यावर अंमलबजावणी करा. नाही आवडलं असेल तर विसरून जा. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांना माझ्याकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्याच्या वेदना झेलणाऱ्या अगणित लोकांप्रति संवेदना व्यक्त करतो, असे ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
महायुती सरकारने नागपूरकर जनतेला अनाेखी भेट दिली आहे. नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठे यश आले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली. लिलाव जिंकून आपली ऐतिहासिक वस्तू परदेशातून परत मिळवण्याची ही पहिलीच वेळ असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आशिष शेलार यांनी आभार मानले.
काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांनी पहलगाम हल्ल्याबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. यावरून शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला चांगलेच खडसावले आहे. पहलगाम दहशतवादी हल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करण्यापूर्वी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे अधिवेशन बोलावून ज्या काँग्रेस नेत्यांनी पहलगाम पीडितांचा अपमान केला त्यांच्यावर कारवाई करणार का? याबाबत भूमिका जाहीर करावी, अशा शब्दांत
वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे आयुक्त विवेक फणसाळकर यांची आज सेवानिवृत्ती होत असून, त्यांच्या जागी भारती यांनी कार्यभार स्वीकारला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांना करारी प्रत्युत्तर दिले आहे. शिखर धवन याने आफ्रिदीला कारगिल युद्धाची आठवण करून दिली आणि त्यांच्या देशातील गरिबीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.