Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Prime Minister
देश-विदेश

Prime Minister : पंतप्रधानांनी लष्कराला दिले कारवाईच्या पद्धती, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य

दहशतवादाचा बीमोड करणे हे आपल्या राष्ट्रीय संकल्पाचे प्रतीक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला कारवाईच्या पद्धती, लक्ष्य आणि वेळ निश्चित करण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.

Ram temple
देश-विदेश

Ram temple : राम मंदिर बांधकाम ५ जूनपर्यंत पूर्ण होणार, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांची माहिती

कोट्यावधी भारतीयांचे श्रद्धास्थान आणि स्वप्न असलेले अयोध्येतील राम मंदिराचे पूर्ण बांधकाम येत्या ५ जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. मंदिराच्या एकूण कामात ९९ टक्के प्रगती झाली असून केवळ अंतिम टप्प्यातील काही धार्मिक विधी बाकी आहेत, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले.

Supreme Court
महाराष्ट्र

Supreme Court : राष्ट्रीय सुरक्षेसाठी पेगासस वापरण्यात काहीही गैर नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पेगासस सारख्या स्पायवेअरचा वापर करण्यात काहीही गैर नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र, अशा तंत्रज्ञानाचा गैरवापर नागरिकांच्या खासगी आयुष्यावर होत असेल, तर त्याचा बारकाईने विचार केला जाईल, असेही न्यायालयाने नमूद केले.

International Drug Racket
देश-विदेश

International Drug Racket : ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त; दोन पोलीस कर्मचारी व कस्टम अधिकाऱ्यासह दहा जणांना अटक

नवी मुंबईत ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे. धक्कादायक म्हणजे दोन पोलीस कर्मचारी व कस्टम अधिकाऱ्यासह दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम 22 एप्रिल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा जणांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी दिली जाणार आहे.

Pahalgam attack
देश-विदेश

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याबाबत झिपलाइन ऑपरेटरवर संशय

काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून वाचलेल्या एका पर्यटकाने झिपलाइन ऑपरेटरवर संशय व्यक्त केला आहे. या पर्यटकाचा व्हिडीओ समोर आला असून तोच संदर्भ देत या पर्यटकाने झिपलाइन ऑपरेटर 100 टक्के संशय व्यक्त केला आहे .राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) त्या झिपलाइन ऑपरेटरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

Rohit Pawar
महाराष्ट्र

Rohit Pawar : आमदार राेहित पवार यांचा संजय गायकवाड यांना पाठिंबा, पाेलीसांवर केले गंभीर आराेप

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर पाेलीसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना नेरुळ ड्रग्ज प्रकरणात पाेलीसांवर गंभीर आराेप केले आहेत.

Pakistan's
देश-विदेश

Pakistan’s : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली हल्ला होण्याची भीती

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकारची धास्ती वाढली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे. या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील, जे घेतले जात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Pratap Sarnaik
महाराष्ट्र

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा, प्रताप सरनाईक यांचे आदेश

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनाकरिता एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. सुमारे १० हजार कोटी संचित तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते,असे त्यांनी सांगितले.

Birdev Done
महाराष्ट्र

Birdev Done : गाववाल्यांचे प्रेम अन् बीरदेव डाेणे ढसाढसा रडला, सजवलेल्या जीपमधून हजाराेंच्या उपस्थितीत मिरवणूक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशात ५५१ वी रँक मिळवणारा यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे याचे मूळगाव यमगेमध्ये प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. बिरदेवच्या यशाने भारावून गेलेल्या ग्रामस्थांनी मुरगूडपासून यमगेपर्यंत जंगी मिरवणूक काढली. बीरदेवच्या कौतुकासाठी जनसागर लोटला होता.

suresh kalmadi
देश-विदेश

Suresh Kalmadi : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यात सुरेश कलमाडी यांना १४ वर्षांनी क्लीन चिट

२०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कथित घोटाळ्यात १४ वर्षांनंतर मोठी घडामोड घडली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला असून, न्यायालयाने तो स्वीकारला आहे. परिणामी, कलमाडी आणि इतर सर्व आरोपींना या प्रकरणातून पूर्णपणे मुक्तता मिळाली आहे.