Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Chhagan Bhujbal
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ शरद पवारांच्या मदतीला, म्हणाले ‘ते’ वक्तव्य जाणीवपूर्वक

पहलगाम हल्ल्याबाबत हिंदू म्हणून मारले का माहित नाही या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका हाेत आहे. मात्र, शरद पवारांचे जुने सहकारी आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पवारांच्या मदतीला धावून आले आहेत. हिंदू मुस्लीम वाद वाढता कामा नये यासाठी त्यांनी मुद्दाम ती गोष्ट टाळली. जाणीवपूर्वक ‘ते’ वक्तव्य केले, असे भुजबळ म्हणाले.

Narayan Rane
महाराष्ट्र

Narayan Rane : भ्रष्टाचार करण्यापेक्षा व्यवसाय बरा, काेंबडीवाला आराेपावर नारायण राणे यांचे प्रत्युत्तर

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या काेंबडीचाेरापासून ते काेंबडीवाल्यापर्यंत आराेप केले जातात. याला नारायण राणे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. भ्रष्टाचार करण्यापेक्षा व्यवसाय केलेला बरा. मी 1982 सालापासून मुंबईत चिकनचा व्यवसाय करतोय. हा व्यवसाय आता भाऊ करतो. आम्ही फक्त गल्ल्यावर बसतो. कापणारे वेगळे असतात. काही लोक कोंबडीवाला म्हणून आमचा उल्लेख करतात, असे नारायण राणे यांनी सांगितलं.

Deputy Chief Minister
महाराष्ट्र

Deputy Chief Minister : थेट उपमुख्यमंत्र्यांसमाेर जिल्हाधिकाऱ्यांचा भ्रष्टाचाराच पाढा, दाेन टक्के घेतल्याशिवाय फाईल काढत नाहीत!

जिल्हाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची खासदार, आमदारांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमाेर पाेलखाेल केल्याने परभणीची जिल्हा आढावा बैठक वादळी ठरली. जिल्हाधिकारी पी. ए.मार्फत पैसे घेतात, असा खासदारांनी आरोप केला, तर जिल्हा नियोजन अधिकारी २ टक्के घेतल्याशिवाय एकही फाईल काढत नाहीत, असा आरोप सर्वच खासदार, आमदारांनी केला. नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी यांना चौकशीसाठी मुंबईत हजेरी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Ramdas Athawale
पुणे

Ramdas Athawale : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा, रामदास आठवले यांची मागणी

जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे, तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत. याकरिता माझी भारत सरकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या व देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी केले आहे.

Assam
देश-विदेश

Assam : पाकिस्तान जिंदाबाद”चा जयघोष करणाऱ्यांवर कारवाई; आसाममध्ये १६ जण अटकेत

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, आसाममध्ये देशविरोधी भावना पसरवणाऱ्या १६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी दिली.

Wang Yi
देश-विदेश

Wang Yi : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चीनचा पाकिस्तानला पाठिंबा; भारतालाच संयम राखण्याचे आवाहन

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना, चीनने रविवारी पाकिस्तानच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या हक्कांना पाठिंबा दिला.

मुंबई

Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा

लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. तसेच लाडक्या बहिणी या 1500 रुपयांत खुश असल्याचे असे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले..

Sanjay Gaikwad
मुंबई

Sanjay Gaikwad : पोलिसांवर आक्षेपार्ह विधान, मुख्यमंत्र्यांचा संताप आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र पोलिसांवर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर संताप व्यक्त केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी, अशी तंबी दिल्यानंतर आमदार संजय गायकवाडच्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आमदार गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Bopdev Ghat
पुणे

Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक

पुण्यातील बोपदेव घाट परिसरातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला वालचंद पोलिसांनी अटक केली आहे. सूरज उर्फ बापू गोसावी असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार होता.

Devendra Fadnavis
पुणे

Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी ‘पुणे अर्बन डायलॉग’ सारखे मंथन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis
पुणे

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महाराष्ट्रातील सर्व पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा लागलेला असून, एकही नागरिक हरवलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित ‘अर्बन डायलॉग’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. “सर्व पाकिस्तानी नागरिक आढळले असून, आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत ते देशाबाहेर जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Mohan Bhagvat
देश-विदेश

Mohan Bhagvat : शेजाऱ्यांना त्रास देत नाही, पण ते धर्माचे पालन करणारे नसतील तर… सरसंघचालकांची पाकिस्तानला धडा शिकविण्याची सूचना

आम्ही शेजाऱ्यांना कधीही त्रास देत नाही. मात्र, ते आपल्या धर्माचे पालन करणार नसतील तर आपल्या प्रजेचे रक्षण करणे हा राजाचा धर्म आहे. यामुळे राजा आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी जे पावले उचलेल, ते लोक लक्षात ठेवतील, असे सांगत पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्याची सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.