पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून, संजय राऊत यांचे भाकीत!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल. संघाची चर्चा बंद दाराआड असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल. संघाची चर्चा बंद दाराआड असते.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रयागराज येथील कुंभमेळ्यावर टीका केली. ईव्हीएमवरही संशय घेत मनसेला मतदान करूनही ती मते दिसली नाहीत असा आरोप त्यांनी केला.
निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या हाती एक सुसंस्कृत राज्य आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. मराठी माणसासाठी जर चांगल्या गोष्टी करणार असाल तर आमचा तुम्हाला निश्चितपणे पाठिंबा आहे. पण प्रत्येक गोष्ट आमचं ऐकून करा अशी अट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे.
धर्म प्रत्येकाने उंबरठ्याच्या आत जोपासला पाहिजे. पण त्यांनी जर धर्म रस्त्यावर आणला तर, आम्ही बुलडोजर फिरवू, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे अमरावतीतील २३ वर्षीय तरुण नावेद अब्दुल नईम या तरुणासाठी यंदाची ईद एक नवीन आशा घेऊन आली आहे. ब्लड कॅन्सरशी (लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया ) लढत असलेल्या नावेदला मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या तत्परतेने मदत मिळाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे गाणाऱ्या स्टॅंड अप काॅमेडियन कुणाल कामरा याच्या विराेधात आता शिवसेना शिंदे गटाची धडाडती ताेफ असलेले शहाजीबापू पाटील उतरले आहेत. ‘काय डाेंगार, काय झाडी.. डायलाॅगसारखाच ‘मातोश्री के अंगण मे कामरा आया, सुपारी लेके गाना गाया असा डायलाॅग त्यांनी मारला आहे.
केंद्र सरकारच्या नक्षलवाद विराेधी माेहीेला चांगले यश मिळत आहे. नक्षलवाद्यांच्या कारवाया कमी हाेत आहेतच पण अनेक कट्टर नक्षलवादी आत्मसमर्पण करू लागले आहेत.
कर्जत येथे आयोजित ६६व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात रंगला.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोन्हीही चांगले आहेत, पण माझ्या मते देवेंद्रजींनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे आणि ते अजूनही उत्कृष्ट काम करत आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
खडकीतील दारुगोळा कारखान्यातून एका कर्मचाऱ्याने काडतुसे चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्तचर यंत्रणेने त्याला पोलिसांच्या मदतीने पकडले. या कर्मचाऱ्याकडून २२ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे नागपूर जिल्हा बँक पोखरली गेली. घोटाळ्यांमुळे बंद पडली.
चांगली सेवा पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे तर मोजावेच लागणार आहेत. पुढील आठवड्यात मी टोल संदर्भांत मोठी घोषणा करणार आहे, यामुळे लोकांची टोल संदर्भात जी काही नाराजी आहे, ती सर्व दूर होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.