विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आम्ही आता अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही. पाकिस्तानमध्ये १०० किमीपर्यंत आत घुसून प्रत्युत्तर दिलं आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केले.
एका कार्यक्रमात बाेलताना शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकसित बनवण्यामध्ये कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही. देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. २०१४ पूर्वी नेहमी दहशतवादी हल्ले व्हायचे. अनेक कटकारस्थाने व्हायची. मात्र त्याला काहीच उत्तर दिलं जात नव्हतं. मात्र आता असं होत नाही.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, आमच्या सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिलं. सैन्यदलामुळे आमची मान अभिमानाने उंचावली. भारताने पाकिस्तानचे हवाईतळ उद्ध्वस्त केले. आमची एअर डिफेन्स सिस्टिम खूप मजबूत आहे. आज पाकिस्तान भयभीत झालेला आहे.
शहा म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हापासून दहशतवाद्यांनी तीन मोठे हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. आज भारताने केलेल्या कारवाईकडे संपूर्ण जग आश्चर्यचकीत होऊन पाहत आहे. तर पाकिस्तान भयभीत झालेलं आहे.अमित शाह पुढे म्हणाले की, जेव्हा उरी येथे हल्ला झाला तेव्हा सर्जिकल स्ट्राईक करून प्रतीकात्मक उत्तर देण्यात आलं.
पुलवामा येथे हल्ला झाला तेव्हा एअर स्ट्राईक करून उत्तर देण्यात आलं. मात्र पाकिस्तानमधील दहशतवादी सुधरले नाहीत आणि त्यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं. जगभरातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक जेव्हा ऑफरेशन सिंदूरचं विश्लेषण करतात. तेव्हा ते आश्चर्यचकीत होतात.
Amit Shah warns that they have penetrated up to 100 km, now do not beg for the threat of nuclear bomb
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर