विशेष प्रतिनिधी
तिरुवनंतपुरम : Thiruvananthapuram केरळच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर तब्बल 45 वर्षांनी सत्ता उलटली असून, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने महापालिकेवर झेंडा फडकवला आहे. हा विजय केवळ सांकेतिक नाही, तर केरळमधील राजकीय समीकरणे बदलण्याची सुरुवात मानली जात आहे.Thiruvananthapuram
एनडीएने 101 पैकी तब्बल 50 वार्ड जिंकत बहुमत मिळवले. सत्ताधारी एलडीएफची 29 जागांवर घसरण झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफकडे 19 जागा गेल्या. दोन जागा अपक्षांना मिळाल्या. एका वार्डमध्ये उमेदवाराचा मृत्यू झाल्याने मतदान रद्द करण्यात आले.तिरुवनंतपुरम हा काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांचा बालेकिल्ला मानला जात असतानाच भाजपने हा गड पाडणे, हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरते.Thiruvananthapuram
महापौरपदी कोण बसणार या चर्चेलाही वेग आला आहे. केरळच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी असलेल्या माजी डीजीपी आर. श्रीलेखा यांनी सस्थमंगलम वार्डातून विजय मिळवला असून, त्यांची महापौरपदी निवड होण्याची जोरदार शक्यता वर्तवली जात आहे.Thiruvananthapuram
एर्नाकुलम जिल्ह्यातील त्रिपुनित्तूरा नगरपालिका पहिल्यांदाच भाजप-एनडीएच्या ताब्यात आली. 53 सदस्यीय सभागृहात एनडीएला 21 जागा, एलडीएफला 20, तर यूडीएफला 12 जागा मिळाल्या.
2020 मध्ये एलडीएफ सर्वात मोठा पक्ष होता, परंतु या वेळी मतदारांनी मोठा कलाटणी देत एनडीएकडे झुकले.
पालक्कड नगरपालिका एनडीएकडे आधीच होती. यंदा त्यांनी अधिक मजबूत कामगिरी करत 25 जागांवर विजय, यूडीएफला 18, तर एलडीएफला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले. केरळमध्ये पालक्कड हे भाजपचे सर्वात मजबूत गडांपैकी एक मानले जाते.
तिरुवनंतपुरममध्ये भाजपचा झेंडा फडकला असला तरी संपूर्ण केरळमध्ये यूडीएफ सर्वात मोठा विजेता ठरला आहे.
6 नगरपालिका निगमांपैकी 4 वर यूडीएफ, तर केवळ 1 वर एलडीएफची सत्ता आली.
यूडीएफने कोल्लम, कोची, त्रिशूर आणि कन्नूर येथे विजय मिळवला, तर एलडीएफला फक्त कोझिकोड मिळाले.
कोझिकोडमध्येही एनडीएने 13 जागा जिंकत आपली ताकद दाखवली. कोल्लममध्ये त्यांना 12 जागा मिळाल्या.
BJP-NDA Makes History in Kerala, Snatches Thiruvananthapuram Corporation from Left After 45 Years
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप