विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तुमच्या वर्गात मॉनिटर असतो तसाच मी आहे. मॉनिटरने होमवर्क केला तरच तो इतर मुलांना होमवर्क केला का? हे विचारु शकतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यशैलीची मुलांना ओळख करून दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा केली. यावेळी मुलांना अभ्यासापासून ते आहारविहाराच्या टिप्स देत नेतृत्वाचेही धडे दिले..
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता तेव्हा सामना सुरु असताना स्टेडियममधून आवाज येत असतात. कुणी सिक्स, कुणी फोर असं ओरडत असतं. फलंदाजाला ते ऐकू येत असतं का? तो समोरुन येणाऱ्या चेंडूकडे पाहात असतो. तो कसा खेळायचा त्याप्रमाणे तो खेळतो. लोकांचं ऐकून तो चौकार आणि षटकार मारु लागला तर त्याची विकेट पडेल. त्याचं संपूर्ण लक्ष समोरुन येणाऱ्या प्रत्येक चेंडूकडे असतं. तुम्हीही जर कोण काय सांगतं आहे यापेक्षा मला आज अभ्यास करायचा आहे, इतक्या वेळेत करायचा आहे. आज हा विषय, उद्या तो विषय असं केलंत तर तुम्हीही परीक्षेला सहज सामोरे जाऊ शकता.”
तुम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्या विषयाचा ताण घेऊ नका. मी जेव्हा विद्यार्थी दशेत होतो तेव्हा माझं हस्ताक्षर चांगलं नव्हतं. पण माझ्या शिक्षकांनी माझं अक्षर सुधारण्यासाठी मेहनत घेतली.
बिहारचा मुलगा विराज याने मोदींना विचारलं की तुम्ही जागतिक स्तरावरचे इतके मोठे नेते आहात, तुम्ही आम्हाला नेतृत्वाबाबत काही गोष्टी सांगा. त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “लीडरशीपचा अर्थ हा नाही की तुम्ही कुर्ता पायजमा घातलात आणि लीडर झालात. मोठमोठी भाषणं करुनही नेता होता येत नाही. तुम्हाला जर नेता व्हायचं असेल, नेतृत्व करायचं असेल तर तुमचं उदाहरण इतरांनी दिलं पाहिजे अशी व्यक्ती बना.
classroom monitor, do homework first, narendra modi lesson to children
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन