विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर: काँग्रेसने मत चोरीच्या मुद्द्यावरून ‘वोट चोर, गद्दी छोड’ हे अभियान जोरदारपणे सुरू केले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कामठी येथे या मोहिमेचा प्रारंभ झाला. या वेळी राज्यातील मतदार याद्यांमधील गोंधळ, बनावट नावे, आणि मत चोरीच्या आरोपांवर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विचित्र प्रकरण उघड केले. एका बापाला थेट 56 मुलं दाखवून मतदार यादीत गोंधळ केला गेला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजपने मत चोरीच्या जोरावर महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले, असा घणाघातही त्यांनी केला. “मतचोरांना धडा शिकवण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहोत,” असे वडेट्टीवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी महाराष्ट्रात मत चोरी कशा प्रकारे झाली याचे पुरावे सादर करून खळबळ उडवली होती. त्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला होता. तसेच बिहारमध्ये राहुल गांधींनी ‘मतदार हक्क यात्रा’ काढून 25 जिल्ह्यांतून 1300 किमीचा प्रवास केला होता. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात काँग्रेसने आपली आक्रमक मोहीम सुरू केली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा केला की, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुर्ची खाली करण्यास सांगितले आहे आणि देशात मध्यावधी निवडणुका लागतील. सुनील केदार यांनी ‘400 पार’ चा नारा हा संविधान बदलण्यासाठी दिला गेला होता असा आरोप केला. “एक जरांगे दिसला, तर मुंबई थरारली. जर सामान्य नागरिक रस्त्यावर आला, तर भाजपला जागा मिळणार नाही,” असे ते म्हणाले.
Congress launches ‘Vote Thief, Quit the Throne’ campaign; alleges BJP won 132 MLAs through vote theft
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा