बिहारमधील दारुण पराभव, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर फोडले खापर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: बिहारमधील दारुण पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर खापर फोडले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.

बिहारच्या निकालावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी सोशल एक्स हँडलवर पोस्ट करत म्हटले आहे की, मी बिहारमधील त्या कोट्यवधी मतदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांनी महागठबंधनवर आपला विश्वास दाखवला. बिहारचा हा निकाल खरोखरच धक्कादायक आहे. जो निवडणूक प्रक्रिया सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती, त्या निवडणुकीत आम्ही विजय मिळवू शकलो नाही.

ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाची आहे. काँग्रेस पक्ष आणि ‘इंडिया’ आघाडी या निकालाचे सखोल विश्लेषण करतील आणि लोकशाही वाचवण्याच्या आपल्या प्रयत्नांना अधिक प्रभावी बनवतील. मी बिहारमधील त्या कोट्यवधी मतदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांनी महागठबंधनवर आपला विश्वास दाखवला. असं ते म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने विक्रमी बहुमत मिळवले आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत काँग्रेससोबत महागठबंधनचे पानिपत झाले आहे.

भाजपने 90 जागा, जदयू 84 जागा आणि एलजेपीने 19 जागा विक्रमी मताधिक्याने जिंकून 200 जागांचा टप्पा ओलांडला एनडीएच्या या झंझावातापुढे राजद 25 जागा आणि काँग्रेसला फक्त 6 जागा जिंकता आल्या आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींनी राज्यभरात 15 सभा घेतल्या. याशिवाय त्यांनी ‘मतदार अधिकार यात्रे’चे नेतृत्व करत बिहारमधील जनतेशी थेट संवाद साधला. ज्यानंतर, त्यांनी बिहारमधील कामगारांशी सुद्धा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.

https://twitter.com/RahulGandhi/status/1989360424199049520

Crushing Defeat in Bihar, Rahul Gandhi Again Blames the Election Commission

महत्वाच्या बातम्या