विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात लढत आहे. सध्या आलेल्या निकालांनुसार, डोनाल्ड ट्रम्प हे 230 जागांवर आघाडीवर असून ते 270 या बहुमताच्या आकड्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. तर, कमला हॅरिस या 210 जागांवर आघाडीवर आहेत.
आतापर्यंत ३० राज्यांचे निकाल समोर आले आहेत. यातील २० राज्यांत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि १० राज्यांत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनी विजय मिळवला आहे. आतापर्यंत, हॅरिस आणि ट्रम्प यांनी त्यांना जिंकण्याची अपेक्षा असलेल्या स्टेट्समध्ये विजय मिळवला आहे. पण अंतिम निकाल सात स्विंग स्टेट्सवर अवलंबून आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी नॉर्थ कॅरोलिना येथे विजय मिळवला आहे. तसेच ते इतर स्टेट्समध्ये आघाडीवर आहेत. कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्निया स्टेटमध्ये विजय मिळवला आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाच्या इलेक्शन लॅबनुसार, ७८ दशलक्षाहून अधिक अमेरिकन नागरिकांनी मतदान केले आहे. सात महत्त्वाच्या राज्यांपैकी पेनसिल्व्हेनिया हे सर्वात महत्त्वाचे राज्य ठरलं आहे, ज्यामध्ये १९ इलेक्टोरल कॉलेज मते आहेत.
लोकसंख्येवर आधारित राज्यांना इलेक्टोरल कॉलेज मते दिली जातात. एकूण ५३८ इलेक्टोरल कॉलेजच्या मतांसाठी मतदान होते. २७० किंवा त्याहून अधिक इलेक्टोरल मते मिळविणाऱ्या उमेदवाराला निवडणुकीत विजयी घोषित केले जाते. अमेरिकेत ५० राज्ये आहेत आणि त्यातील ‘स्विंग’ राज्ये वगळता बहुतेक राज्य हे प्रत्येक निवडणुकीत एकाच पक्षाला मतदान करतात. आतापर्यंत समोर आलेल्या मतमोजणीनुसार डोनाल्ड ट्रम्प हे १६ राज्यांत विजयी झाले आहेत.
इलेक्टोरल कॉलेज ही प्रत्यक्षात राष्ट्रपती निवडणारी संस्था आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सामान्य जनता अशा लोकांना मत देते जे इलेक्टोरल कॉलेज बनवतात. या लोकांचं काम राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवड करणे असते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंगळवारी राष्ट्रपती निवडणाऱ्यांसाठी मतदान होते. निवडून आल्यानंतर हे मतदार डिसेंबर महिन्यात आपापल्या राज्यात एका ठिकाणी जमतात आणि राष्ट्रपतींच्या निवडीसाठी मतदान करतात.
Donald Trump Leading in the U.S. Election with 230 Seats, Kamala Harris Trails
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देशात अराजकता पसरविण्याचा राहुल गांधी यांचा डाव, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- Manoj jarange : संपूर्ण महाराष्ट्र हादरवण्याच्या जरांगेंच्या गर्जना; प्रत्यक्ष लढण्यात आणि पाडण्यात आपला “निवडक” मराठवाडाच बरा!!
- Manoj Jarange : मनाेज जरांगे यांच्या ताेंडी महाविकास आघाडीची भाषा
- पाठीमागे अदृश्य शक्ती, आमचं ठरलंय ..राम सातपुते यांच्या दाव्याने उत्तम जानकर