विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांनी आपल्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे. आमचं ठरलय असा विश्वास व्यक्त केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर अस्वस्थ झाले आहेत. मोहिते पाटील गटाचा काही डाव तर नाही ना अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. Ram Satpute’s Claim Rattles Uttam Jankar
माझी रस्ते विद्यमान आमदार राम सातपुते यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोहिते पाटील यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात आला. धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूकही जिंकली. यावेळी उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांची साथ दिली होती. त्याची परतफेड म्हणून मोहिते पाटील विधानसभा निवडणुकीत जानकर यांना मदत करणार असेही ठरले होते. मात्र सातपुते यांच्या विधानाने पडद्यामागे वेगळी रणनीती तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत जाणकार आणि मोहिते पाटील एकत्र असूनही महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना 65000 वर मते मिळाली होती
उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. गेल्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना मदत केली होती. त्यामुळेच सातपुते निवडून आले असेही बोलले जात होते. मात्र आता जानकर आमदार झाल्यास मोहिते पाटील यांना त्यांच्याशी जमवून घ्यावे लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष असल्याने याबाबत साशंकताच आहे. त्यामुळे मतदार संघात वेगळीच गणिते पुढे आल्याची चर्चा आहे. अदृश्य शक्ती, आमचं ठरलय या राम सातपुतेंच्या वक्तव्यावर संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे. अदृश्य शक्ती कोण? काय ठरलय? हा प्रश्न देखील माळशिरस तालुक्यातील विरोधकांना पडला आहे.
राम सातपुते यांच्या माध्यमातून या मतदार संघात चांगली कामे झालेली आहेत. सर्वसामान्य नागरिकसुद्धा हेच बोलू लागला आहे आणि हिच आपल्या कामाची पोचपावती असून कार्यकर्त्यांनी सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. आपण आपले काम प्रामाणिकपणे करायचे आहे असेही सातपुते म्हणाले.
दरम्यान राम सातपुते यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत हजारोंच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला. मांडवे येथील निवासस्थानापासून ते अकलूज प्रांत कार्यालयापर्यंत रॅली काढत, कार्यकर्त्यांनी घोषणा देत मोठे शक्ति प्रदर्शन केले.
Ram Satpute’s Claim Rattles Uttam Jankar
महत्वाच्या बातम्या
-
Shiv Sena UBT : शिवसेना ‘UBT’ने जाहीर केली आणखी एक उमेदवार यादी !Ajit Pawar : अजित पवारांना माेठा धक्का, दाेन विद्यमान आमदारांनी घेतली शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी
-
Ajit Pawar : घरी बोलावता , जेऊ घालता आणि अदृश्य हात तुतारीसाठी वापरता? अजित पवारांचे हर्षवर्धन पाटील यांच्यावर जाहीर टीका
-
Congress काॅंग्रेसची २३ जणांची यादी जाहीर, लहू कानडे यांना नाकारली उमेदवारी