विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: जीएसटी परिषदेच्या ५६व्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला असून, आता जीएसटीचे फक्त दोनच स्लॅब राहणार आहेत. याआधी असलेले ४ दर कमी करून ५% आणि १८% असे दोनच दर ठेवण्यात आले आहेत. हा बदल २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. GST
या निर्णयामुळे शॅम्पू, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, शेविंग क्रीम यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी १८% वरून ५% इतका कमी झाला आहे. त्याचप्रमाणे बटर, तूप, चीज, भांडी, बेबी नॅपकिन्स, फीडिंग बॉटल यांनाही ५% जीएसटी लागू होईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले की दूध, रोटी, पिझ्झा ब्रेड, चेन्ना यांसह अनेक अन्नपदार्थांवर जीएसटी लागणार नाही. तसेच वैयक्तिक आरोग्य विमा, जीवन विमा आणि ३३ जीवनरक्षक औषधेसुद्धा पूर्णपणे करमुक्त असतील. दुर्मिळ आणि गंभीर आजारांवरील औषधांनाही सूट देण्यात आली आहे.
लक्झरी वस्तू आणि तंबाखू उत्पादनांवर ४०% जीएसटी कायम राहणार आहे. तसेच ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या कार आणि मोटारसायकलींवरही या स्लॅबचा परिणाम होईल. मात्र तंबाखूजन्य उत्पादनांवरील नवीन दर अद्याप लागू करण्यात आलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर लिहिले की, “स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मी जीएसटीमध्ये पुढील पिढीतील सुधारणा आणण्याची घोषणा केली होती. आजचा हा निर्णय त्या दिशेने मोठे पाऊल आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जीवन सोपे होईल आणि देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत बनेल.”
हा निर्णय नागरिकांना दिलासा देणारा आणि लहान व्यवसायांना हातभार लावणारा ठरणार असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे.
GST now has only two rates: 5% and 18%.
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा