Hemant Biswa Sarma : इस्लामिक देशातील हँडलर कॉँग्रेसच्या समर्थनार्थ चालवताहेत 5 हजार पेक्षा अधिक सोशल मिडिया अकाऊंट, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा

विशेष प्रतिनिधी

दिसपूर: इस्लामिक देशातील काही हँडलर हे कॉँग्रेसच्या समर्थनार्थ 5 हजार पेक्षा अधिक सोशल मिडिया अकाऊंट चालवत आहेत. 2026 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी आसामच्या राजकारणात हा सर्वात मोठा परकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Hemant Biswa Sarma) केला आहे.

हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेक्षी संबंधित असून, संबंधित यंत्रणा याचा तपास करत असल्याचे मुख्यमंत्री सरमास यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले,”पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या निमंत्रणावरून गौरव गोगोई पाकिस्तानला गेले होते. ते तिकडे कशासाठी गेले होते याचे भक्कम कागदपत्रे आमच्याकडे आहेत.”

कॉँग्रेस खासदार गौरव गोगोई ही पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणाअसलेल्या आयएसआयच्या निमंत्रणावरून पाकिस्तानला गेले होते. याबाबत यांच्याकडे माहिती आहे. ते नक्कीच पर्यटनाच्या दृष्टीने तिथे गेले नव्हते तर, प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीने गेले होते.

हेमंत शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर कॉँग्रेसकडून अजून उत्तर आलेले नाही. यावर बोलताना पक्षाकडे लवपण्यासारखे काही नसेल तर ते पुढे येऊन या आरोपाना उत्तर का देत नाहीत असा प्रश्न मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी उपस्थित केला आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांनी या केंद्रीय निवडणूक आणि गृह मंत्रालयाकडे चौकशीची मागणी केली आहे. Hemant Biswa Sarma

Handlers in Islamic countries are running more than 5,000 social media accounts in support of Congress, Assam Chief Minister Hemant Biswa Sarma

महत्वाच्या बातम्या