ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची जागतिक कूटनीतिक मोहीम, पंतप्रधान मोदींनी घेतली सर्वपक्षीय शिष्टमंडळाशी भेट

 

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर मोदी सरकारने दहशतवादाविरोधातील आपली शून्य सहनशीलता धोरण स्पष्ट करण्यासाठी सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांत पाठवली. या शिष्टमंडळांमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीतील खासदार, माजी राजदूत आणि संसद सदस्यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७ लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी या शिष्टमंडळातील सदस्यांची भेट घेतली. all-party delegation

काँग्रेसचे खासदार शशी थरूर, जेडीयूचे संजय झा, शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, डिएमकेच्या कनिमोळी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या सुप्रिया सुळे, भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंती पांडा यांचा या शिष्टमंडळांमध्ये समावेश होता.



पंतप्रधान मोदींनी या शिष्टमंडळांचे भारताच्या शांततेच्या प्रयत्नांबाबत जागतिक पातळीवर यशस्वीरित्या भूमिका मांडल्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले, “या सर्व शिष्टमंडळांनी भारताचा दहशतवादविरोधी दृष्टिकोन जगासमोर प्रभावीपणे मांडला. आपला संदेश जगभर पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.”

या मोहिमेंतर्गत एकूण ७ शिष्टमंडळांनी ३३ देश व युरोपियन युनियन मध्ये भारताच्या वतीने भेटी दिल्या. या देशांमध्ये सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन, अल्जेरिया, युके, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्क, इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर, यूएई, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओन, अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील, कोलंबिया, स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया, रशिया, इजिप्त, कतार, इथियोपिया, दक्षिण आफ्रिका आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.

ही मोहिम ऑपरेशन सिंदूर नंतर सुरू करण्यात आली होती. काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लष्करी कारवाई केली होती. या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. पाकिस्तानकडून ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले सुरू झाले होते, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमाजवळील गावांवर हल्ले केले. याला उत्तर म्हणून भारताने सैन्यबळाबरोबरच कूटनीतिक आघाडीलाही मजबूत केले

शिष्टमंडळ भारतात परतल्यानंतर, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि विविध देशांतील प्रतिसाद समजून घेतला.

India’s global diplomatic campaign after Operation Sindoor, PM Modi meets all-party delegation

महत्वाच्या बातम्या