Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती

Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती

Colonel Sophia Qureshi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ‘Sophia Qureshi ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने केलेल्या कारवाईला उत्तर देताना पाकिस्तानने भारतावर थेट ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी भारतानेही पाकिस्तानी शहरांवर हल्ला चढवून ठोस प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, या हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानच्या बेजबाबदार वागण्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. भारतावर हल्ला करत असतानाही पाकिस्तानने कराची आणि लाहोरमधील नागरी विमानसेवा सुरू ठेवली होती, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत दिली.Sophia Qureshi

कर्नल कुरेशी यांनी सांगितले की, 8 आणि 9 मेच्या दरम्यान पाकिस्तानने लेहपासून सर क्रीकपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर 36 ठिकाणी हवाई घुसखोरी करत लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं. या हल्ल्यांमध्ये 300 ते 400 ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोनचा उद्देश भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची माहिती मिळवणे हा होता. मात्र भारतीय सशस्त्र दलांनी त्यातील अनेक ड्रोन निष्प्रभ करत पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले. यातील बहुतांश ड्रोन हे तुर्कस्तानमध्ये तयार झाल्याचेही प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.

याच दरम्यान पाकिस्तानच्या सशस्त्र UAV ने भटिंडा येथील लष्करी तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तोही भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने निष्फळ ठरवला. या घडामोडींनंतर भारतानेही प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या चार हवाई संरक्षण तळांवर सशस्त्र ड्रोन पाठवले. यातील एका ड्रोनने पाकिस्तानचा AD रडार यशस्वीरित्या उद्ध्वस्त केला.

पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील तंगधार, उरी, पूंछ, मेंढर, राजौरी, अखनूर आणि उधमपूर भागात सशस्त्र ड्रोन आणि जड तोफखान्याचा वापर करत नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यांत काही भारतीय जवान हुतात्मा झाले. त्यानंतर भारताने केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी स्पष्ट केलं की, 7 मे रोजी रात्री 8.30 च्या सुमारास पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. मात्र, अशा संवेदनशील स्थितीतही त्यांनी आपली नागरी हवाई सेवा बंद केली नाही. हे त्यांच्या बेजबाबदार आणि धोकादायक वागण्याचे निदर्शक आहे. पाकिस्तान आपली नागरी हवाई सेवा ढाल म्हणून वापरत असून, भारताकडून मिळणाऱ्या संभाव्य प्रत्युत्तराला रोखण्याचा हा प्रयत्न होता.

 

Irresponsible Pakistan continued civil aviation services even while attacking India, says Colonel Sophia Qureshi

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023