मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, कृषी क्षेत्रातील अनेक वस्तूंवरील करदर १२ वरून ५ टक्क्यांवर कमी

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, कृषी क्षेत्रातील अनेक वस्तूंवरील करदर १२ वरून ५ टक्क्यांवर कमी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेत जीएसटी परिषदेने कृषी क्षेत्रातील अनेक वस्तूंवरील करदर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. Modi government

जीएसटी परिषदेच्या ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कररचनेत मोठे बदल करण्यात आले.

नवीन निर्णयानुसार ट्रॅक्टर, मशागत किंवा शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, बागायती व वनीकरणासाठी लागणारी उपकरणे, लॉन किंवा खेळाच्या मैदानी रोलर्स, ठिबक सिंचनासाठी लागणारे नॉझल्स आणि स्प्रिंकलर नॉझल्स या वस्तूंवर करदर ५ टक्के करण्यात आला आहे.मात्र, १८०० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमतेचे रोड ट्रॅक्टर्स फॉर सेमी-ट्रेलर्स या वाहनांना ही सवलत लागू होणार नाही.

या निर्णयाचा फायदा पानमसाला, गुटखा, सिगारेट, झर्दा, तंबाखू आणि बीडी यांसारख्या तंबाखूजन्य उत्पादनांना मिळणार नाही. या वस्तूंवरील जीएसटी दर पूर्ववत राहतील.



या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात लक्षणीय घट होणार असून कृषी यांत्रिकीकरणाला चालना मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ट्रॅक्टर, सिंचन यंत्रणा यावर लागणारा करदर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे.

सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी घेतला असून कृषी उत्पादनक्षमता वाढवण्याचा हेतू यामागे असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोणत्या कृषी वस्तूंवर करदर घटवला?

१. ट्रॅक्टर व कृषी यंत्रसामग्री – ट्रॅक्टर, माती तयार करण्याची यंत्रे, नांगर, कल्टिव्हेटर, रोप लावणी यंत्र, गवत कापणी यंत्र.
२. बागायती व वनीकरण यंत्रसामग्री – बागेतील मशागतीसाठी लागणारी उपकरणे, फळ तोडणी यंत्र.
३. लॉन व स्पोर्ट्स ग्राउंड रोलर्स – खेळाच्या मैदानाची देखभाल करणारी यंत्रे.
4. सिंचन साधने – ठिबक सिंचनासाठी नॉझल्स, स्प्रिंकलर नॉझल्स.

अपवाद काय आहेत?

१८०० सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेले रोड ट्रॅक्टर्स (सेमी-ट्रेलर्ससाठी) यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही.
पानमसाला, गुटखा, सिगारेट, झर्दा, असंसाधित तंबाखू, बीडी यांच्यावर करदर कमी केलेला नाही.

Modi government’s relief to farmers, tax rate on many agricultural goods reduced from 12 to 5 percent

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023