विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: मुस्लिम मतदारांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप,) हात दाखवल्याचे चित्र समोर येत आहे. मुस्लिम बहुल मतदारसघातही आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला अजून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 जागांवर आप, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, एआयएमआयएम आणि इतर पक्षांनी नशीब आजमावलं. दिल्लीत जवळपास 13 टक्के मुस्लिम मतदार आहेत. आतापर्यंत पाच जागांवर मुस्लिम उमेदवार निवडून येण्याची परंपरा आहे. यापूर्वी आपचा वरचष्मा असलेल्या मुस्लिम बहुल भागात यावेळी भाजपाने सुरूंग लावल्याचे दिसून येत आहे.
दिल्लीतील मुस्लिम बहुल भागात सर्वाधिक मतदान झाले होते. त्यामुळे आपला आपला विजय निश्चित मानण्यात येत होता. पण जे कल येत आहे, त्यात भाजपा आघाडीवर असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. मुस्तफाबाद, बल्लीमारान, सीलमपुर, मटिया महल, चांदणी चौक आणि ओखला या मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा दिसत असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यापूर्वीच्या इतर राज्यांच्या निवडणुकीत सुद्धा मुस्लिम मतदार, विशेषतः महिला मतदारांनी भाजपाच्या बाजूने मतदान केल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यापूर्वी यासर्व मतदारसंघात भाजपासोडून इतर पक्षाचे मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत.
मुस्तफाबाद मतदारसंघात AIMIM चे ताहिर हुसैन, आम आदमी पक्षाचे आदिल खान, काँग्रेसचे अली मेंहदी आणि भाजपाकडून मोहन सिंह बिष्ट निवडणूक लढवत आहेत. बल्लीमारान मतदारसंघात आम आदमी पक्षाचे इमरान हुसैन, काँग्रेसचे हारून यूसुफ आणि भाजपाकडून कमल बांगड़ी निवडणूक लढवत आहेत. मटिया महल विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे मोहम्मद इकबाल आणि काँग्रेसचे आसिम मोहम्मद खान तर भाजपाकून दीप्ति इंदौरा निवडणूक लढवत होते.
Muslim voters showed hand to Aam Aadmi Party
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन