विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) म्हणून निवडणूक लढवणार भाजपा मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत महागठबंधनचे पानिपत झाले आहे. Bihar assembly elections
बिहारमध्ये बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपने 90 जागा, जदयू 84 जागा आणि एलजेपीने 19 जागा विक्रमी मताधिक्याने जिंकून 200 जागांचा टप्पा ओलांडला एनडीएच्या या झंझावातापुढे राजद 25 जागा आणि काँग्रेसला फक्त 6 जागा जिंकता आल्या आहेत. या विजयानंतर बिहारला सलग 20 वर्षे स्थिर सरकार देणारे व पंचाहत्तरी ओलांडलेले नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसणार की भाजप नवा चेहरा देणार यावर अद्याप स्पष्टता नाही. Bihar assembly elections
एनडीएच्या या विजयात ऐन निवडणुकीआधी 10 हजार रुपये देणारी महिला रोजगार योजना गेमचेंजर ठरली. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या योजनेचा लाभ दीड कोटी महिलांनी घेतला. महिलांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत या निवडणुकीत मतदान केले. पुरुषांच्या (62.8 टक्के) तुलनेत महिलांनी (71.6 टक्के) 8.8 टक्के अधिक मतदान नोंदवले. परिणामी 1951 नंतर बिहारमध्ये विक्रमी 66.91 टक्के मतदान नोंदवण्यात आले. या योजनेचा मोठा फायदा नितीश कुमारांच्या जदयूला झाला. गेल्यावेळी 43 जागा जिंकणार्या जदयूच्या जागा दुपटीने वाढून 84 वर गेल्या. भाजपनेही 20 जागांची वाढ नोंदवली.
गेल्यावेळी 1 जागा जिंकणारा लोकजनशक्ती पक्ष थेट 19 वर पोहोचला. या तुलनेत राजदची 50 जागांनी मोठी पिछेहाट झाली. मतचोरी आणि एसआयआरवरून भाजप व निवडणूक आयोगाला लक्ष्य करणार्या राहुल गांधींकडे मतदारांनी सपशेल पाठ फिरवली. यामुळे काँग्रेस घसरून 19 वरून 6 जागांवर आला. मागच्या 30 वर्षांतील काँग्रेसची ही निच्चांकी आकडेवारी आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला मतदारांनी काही किंमत न दिल्याने त्यांना एकही जागा मिळवता आली नाही.
अंतिम आकडेवारी
भाजप – 90
जदयू – 84
लोकजनशक्ती – 19
राजद – 25
काँग्रेस – 6
इतर पक्ष आणि अपक्ष – 19
जनसुराज – 0
एकून – 243
NDA gets record majority in Bihar assembly elections, grand alliance collapses
महत्वाच्या बातम्या
- विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप
- ताडाेबातील वाघ सह्याद्रीच्या घाटावर, तीन नर आणि पाच मादी वाघांचे स्थानांतर
- विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप
- ताडाेबातील वाघ सह्याद्रीच्या घाटावर, तीन नर आणि पाच मादी वाघांचे स्थानांतर