Sonia Gandhi, : नेहरूंची कागदपत्रे ‘हरवलेली’ नाहीत, ती सोनिया गांधींकडेच ; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण, 51 पेट्या परत करण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Sonia Gandhi,माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची कागदपत्रे हरवलेली नाहीत, तर ती 2008 पासून सोनिया गांधी यांच्या ताब्यात आहेत, असे स्पष्ट करत केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या उत्तरावर स्पष्टीकरण जारी केले आहे. या कागदपत्रांना हरवलेली ,( ‘missing’) म्हणून नोंद न करण्यामागचे कारणही सरकारने स्पष्ट केले असून, 51 पेट्या (कार्टन्स) दस्तऐवज तातडीने परत करण्याचे आवाहन सोनिया गांधींना करण्यात आले आहे.Sonia Gandhi,

केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने सांगितले की, नेहरूंच्या कागदपत्रांचे ठिकाण माहीत असल्यामुळे ती ‘हरवलेली’ म्हणून नोंदवलेली नाहीत. ही कागदपत्रे सध्या सोनिया गांधी यांच्या ताब्यात असल्याची नोंद अधिकृत कागदपत्रांमध्ये आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.Sonia Gandhi,



हा मुद्दा शुक्रवारी संसदेत उपस्थित झाला होता. भाजप खासदार संबित पात्रा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले होते की, पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालय (PMML) येथे कागदपत्रांचे वार्षिक ऑडिट करण्याची पद्धत नाही आणि 2025 च्या तपासणीत नेहरूंशी संबंधित कोणतीही कागदपत्रे हरवलेली आढळली नाहीत.

यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारवर खोटे बोलल्याचा आरोप करत माफीची मागणी केली. मात्र, या आरोपांना प्रत्युत्तर देताना केंद्र सरकारने सविस्तर स्पष्टीकरण दिले.

संस्कृती मंत्रालयाने सांगितले की, 29 एप्रिल 2008 रोजी सोनिया गांधी यांचे सहाय्यक एम. व्ही. राजन यांनी पत्र लिहून नेहरूंची खासगी कौटुंबिक पत्रे व नोंदी परत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार 51 पेट्या नेहरू पेपर्स सोनिया गांधी यांच्याकडे पाठवण्यात आल्या.

तेव्हापासून PMML प्रशासन सातत्याने या कागदपत्रांच्या परतफेडीसाठी सोनिया गांधी यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करत आहे. याच वर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यातही पत्र पाठवण्यात आले असल्याचे मंत्रालयाने नमूद केले.

मंत्रालयाने ठामपणे म्हटले की,“ही कागदपत्रे देशाच्या दस्तऐवजीक वारशाचा भाग आहेत, खासगी मालमत्ता नाहीत. नागरिक आणि संशोधकांना संशोधनासाठी त्यांचा प्रवेश मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

दिल्लीतील तीन मूर्ती भवन येथे असलेले पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालय पूर्वी नेहरू स्मारक संग्रहालय व ग्रंथालय म्हणून ओळखले जात होते. 2023 मध्ये मोदी सरकारने त्याचे नाव बदलून Prime Ministers’ Museum and Library (PMML) केले असून, ते सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित आहे.

केंद्र सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, आता सोनिया गांधी या कागदपत्रांबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nehru Papers Not ‘Missing’ but With Sonia Gandhi, Centre Clarifies, Seeks Return of 51 Boxes

महत्वाच्या बातम्या