Supreme Court : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग घेतल्याने घरगुती अत्याचाराला सूट मिळत नाही, पत्नीच्या हत्येप्रकरणी ब्लॅक कॅट कमांडोला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यास नकार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग घेतला असल्याने पत्नीच्या हुंडाबळी प्रकरणी दोषी तरुणही शिक्षेपासून सुटका मिळावी ब्लॅक कॅट कमांडोने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला आहे .

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या दोषनिर्णय आणि शिक्षेच्या निर्णयाविरुद्ध बलजिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली होती. संबंधित कमांडोने ऑपरेशन सिंदूरमध्ये आपला सहभाग होता. त्यामुळे न्यायालयाने शिक्षेत सूट देण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होणे हे घरात अत्याचार करण्यास माफी मिळविण्याचे प्रमाणपत्र नाही.”

न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सिंग यांच्या वकिलाने सांगितले की, “मी फक्त एक वाक्य सांगू इच्छितो मी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होतो. गेल्या २० वर्षांपासून मी राष्ट्रीय रायफल्समध्ये ब्लॅक कॅट कमांडो म्हणून कार्यरत होतो.”

यावर न्यायमूर्ती भुयान यांनी उत्तर दिले की, “ही बाब तुमची शारीरिक क्षमता दर्शवते. त्यामुळेच तुम्ही पत्नीची गळा दाबून हत्या करू शकता हे स्पष्ट होते.” न्यायालयाने हेही नमूद केले की, “ही सूट केवळ ६ महिने, १ वर्ष किंवा ३ महिन्यांच्या शिक्षेसाठीच दिली जाते. पण इथे प्रकरण अत्यंत गंभीर असून पत्नीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.”

सिंग यांनी अपील प्रलंबित असताना आत्मसमर्पणातून सूट देण्याची विनंती केली होती, मात्र तीही न्यायालयाने फेटाळली. त्यांच्या शिक्षेच्या विरोधात अपीलसाठी नोटीस जारी करण्यात आली असली तरी त्यांना दोन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे आदेशही देण्यात आले.

सिंग यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, दोषारोप करणारे साक्षीदार हे मृत महिलेचे नातेवाईक होते. मात्र, हे कारण ग्राह्य न धरता सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या सूट अर्जास नकार दिला आणि आत्मसमर्पणासाठी अंतिम मुदत दिली.

Participation in Operation Sindoor does not exempt domestic violence, Supreme Court refuses to grant relief to Black Cat commando in wife murder case

महत्वाच्या बातम्या