PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले म्हणून ट्रम्प यांच्या जेवणाच्या आमंत्रणाला दिला नकार…

विशेष प्रतिनिधी

भुवनेश्वर :  अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना जेवणासाठी व वॉशिंग्टनमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केले होते. मात्र, आपल्या प्रेमाचे आणि महाप्रभूच्या आशीर्वादाचे हे स्थान माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांचे हे आमंत्रण सौजन्याने नाकारून ओडिशातील दौऱ्याला प्राधान्य दिले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. PM Narendra Modi

भुवनेश्वर येथे भाजप सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, “मी दोन दिवसांपूर्वी कॅनडामध्ये जी 7 (G7) परिषदेच्या निमित्ताने होतो. तिथे असतानाच ट्रम्प यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘तुम्ही कॅनडात आहात तर वॉशिंग्टनमार्गे या. आपण जेवू करूया, चर्चा करूया. त्यांनी खूप आग्रहाने आमंत्रण दिलं. आपल्या प्रेमाचे आणि महाप्रभूच्या आशीर्वादाचे हे स्थान माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. महाप्रभूच्या भूमीवरील प्रेम आणि भक्तीने मला इथे आणलं आहे.”

काँग्रेसवर जोरदार टीका करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसने आदिवासी भागांना मुद्दाम दुर्लक्षित केलं आणि ‘रेड कॉरिडॉर’ म्हणत त्यांची प्रतिमा मलीन केली. भारतातील १२५ पेक्षा अधिक आदिवासी बहुल जिल्हे अनेक वर्षे माओवादी प्रभावाखाली होते. या भागांना मागास जिल्हे ठरवून तिथल्या लोकांची उपेक्षा केली गेली. मात्र भाजपने माओवाद संपवून त्यांना विकासाच्या प्रक्रियेत आणले.

पुरीच्या श्रीजगन्नाथ मंदिराचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “भाजप सरकारने पुरीच्या मंदिराची चारही द्वारे आणि ‘रत्न भांडार’ लोकांसाठी उघडून दीर्घकाळची मागणी पूर्ण केली आहे.”आजचा दिवस विशेष आहे. ओडिशातील पहिल्या भाजप सरकारच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ही केवळ सरकारची वर्षपूर्ती नाही, तर चांगल्या प्रशासनाची सुरुवात आहे.हे सरकार ‘जनसेवा आणि जनविश्वास’ यांना समर्पित आहे. आधीच्या सरकारांमध्ये भ्रष्टाचार, विकासामभिमुख भूमिकेचा अभाव असल्याने अनेक भागांची उपेक्षा झाली. मात्र, भाजप सरकारने यावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. PM Narendra Modi

PM Narendra Modi declines Trump’s dinner invitation as he told him to…

महत्वाच्या बातम्या