विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील हजरतबल येथे राष्ट्रीय चिन्हाचे झालेले विटंबन हे प्रकरण अजून शमलेले नसतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार तारिक अन्वर यांनी दिलेल्या विधानावरून नवे राजकीय वादळ उठले आहे. अन्वर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना “जे झालं ते झालं” असे वक्तव्य केले. या एका वाक्यामुळे भाजपने काँग्रेसवर तीव्र हल्लाबोल केला असून, पक्षनेते राहुल गांधींना थेट लक्ष्य केले आहे. Hazratbal
भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितले की राष्ट्रीय चिन्ह हा देशाच्या अभिमान आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. त्याची झालेली विटंबना ही गंभीर बाब आहे, मात्र काँग्रेस खासदाराने ती “जे झालं ते झालं” अशा शब्दांत सहजतेने झटकून टाकणे हे असंवेदनशील आहे. भाजप प्रवक्ता गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, “राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे की तारिक अन्वर यांचे विधान हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत मत आहे का? देशाच्या अभिमानाशी निगडित प्रश्नावर काँग्रेसकडून अशी बेफिकीर भूमिका अपेक्षित नाही.”
संपूर्ण वादाची मुळे म्हणजे श्रीनगरमधील पवित्र हजरतबल परिसरात बसविण्यात आलेल्या राष्ट्रीय चिन्हाचे झालेल्या विटंबनेचे वृत्त. सामाजिक माध्यमांवर काही छायाचित्रे व्हायरल झाली ज्यामध्ये चिन्हाची हानी झाल्याचे दिसून आले. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली. केंद्रीय गृह मंत्रालयाने याची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले असून, जम्मू-काश्मीर प्रशासनाला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
वाद वाढताच काँग्रेस पक्षातील सूत्रांनी सांगितले की अन्वर यांचे वक्तव्य वेगळ्या संदर्भात करण्यात आले होते, त्याचा उद्देश राष्ट्रीय चिन्हाच्या विटंबनेला किरकोळ दाखविण्याचा नव्हता. मात्र भाजपने या स्पष्टीकरणाला नाकारत काँग्रेसवर “जनतेच्या भावना न समजण्याचा” आरोप कायम ठेवला.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हजरतबल चिन्ह प्रकरणामुळे भाजपला काँग्रेसवर राष्ट्रभक्तीच्या मुद्यावर आक्रमण करण्याची संधी मिळाली आहे. भाजप या वादाचा उपयोग आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला बचावात्मक स्थितीत आणण्यासाठी करेल, तर काँग्रेस भाजपवर या प्रकरणाचा “राजकीय फायदा घेण्याचा” आरोप करत आहे.
Political controversy over comment on national symbol in Hazratbal; BJP attacks Congress
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा