विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठी राबवलेल्या ‘व्होट चोरी’ कट कारस्थानाच्या आरोपांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ७ ऑगस्ट रोजी गांधींनी पत्रकार परिषदेत मांडलेले कागदपत्र प्रत्यक्षात भारताबाहेर तयार झाले असल्याचे उघड झाले आहे. Rahul Gandhi
१० सप्टेंबर रोजी ‘खुर्पेन्च’ या लोकप्रिय एक्स हँडलने धक्कादायक माहिती जाहीर केली. या खात्याने सात ट्विट्सच्या मालिकेत सविस्तर पुरावे मांडत म्हटले की, राहुल गांधींचे ‘व्होट चोरी’ कागदपत्र म्यानमारमध्ये तयार करण्यात आले आहे. Rahul Gandhi
राहुल गांधींनी त्यांच्या वेबसाईटवर ‘Vote Chori Proof’ या मजकुरासह लिंक शेअर केली होती. त्यात ‘Rahul Gandhi’s Presentation’ नावाची गूगल ड्राईव्ह फोल्डर होती, ज्यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि कन्नड अशा तीन पीडीएफ फायली होत्या.
या फाइल्सचे मेटाडेटा तपासल्यावर सर्व कागदपत्रे म्यानमार स्टँडर्ड टाइम (MMT) मध्ये तयार झाल्याचे उघड झाले. म्यानमारचा वेळ यूटीसीपेक्षा साडेसहा तास पुढे आहे, तर भारताचा वेळ पाच तास साडेतीस मिनिटे पुढे आहे. त्यामुळे भारतात तयार झालेल्या फाइल्समध्ये UTC+5:30 असा तपशील दिसतो. परंतु राहुल गांधींच्या दस्तऐवजांमध्ये UTC+6:30 असल्याचे स्पष्ट झाले.
‘खुर्पेन्च’ने हेही नमूद केले की VPN वापर किंवा गूगल ड्राईव्हद्वारे फाइल शेअर केल्याने मेटाडेटा बदलत नाही. त्यामुळे हे कागदपत्र परदेशातूनच तयार झाले, असा निष्कर्ष काढला जात आहे.
या खुलाशांनंतर काँग्रेस नेते गोंधळले असून, सोशल मीडियावर त्यांच्या आयटी सेलने प्रतिकार मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकरणामुळे काँग्रेस आणि राहुल गांधींची विश्वासार्हता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
Rahul Gandhi’s ‘vote theft’ document originated from abroad
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा