विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : ओडिशातील झारसुगुडा पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींविरोधात दाखल असलेल्या प्रकरणाच्या चौकशीत राजीव गांधी फाउंडेशनला (RGF) औपचारिक नोटीस बजावून महत्त्वाची कागदपत्रे व माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. Rajiv Gandhi Foundation
ही नोटीस ३ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली असून, फाउंडेशनला परदेशी देणग्या, बँक खात्यांची माहिती, ऑडिटर्सची नावे व संपर्क, तसेच वादग्रस्त स्त्रोतांकडून मिळालेल्या देणग्यांचा सविस्तर तपशील मागविण्यात आला आहे. ही कागदपत्रे ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत झारसुगुडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) यांच्यासमोर प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा भारतीय दंड संहिता (BNS) कलम २१० अंतर्गत कारवाई होऊ शकते, असा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
राजीव गांधी फाउंडेशनच्या संचालक मंडळात राहुल गांधींसह सोनिया गांधी (अध्यक्ष), प्रियांका गांधी वाड्रा, पी. चिदंबरम, सुमन दुबे, अशोक गांगुली, मोंटेक सिंग आहलुवालिया आणि विजय महाजन यांचा समावेश आहे. नोटीस फाउंडेशनचे वित्त संचालक संदीप आनंद यांना पाठवण्यात आली असून, १९९१ पासून आतापर्यंतच्या सर्व परदेशी देणग्यांचा वर्षनिहाय तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय, या खात्यांवर अधिकृत सही करणाऱ्या व्यक्तींची वैयक्तिक माहिती, तसेच FCRA (Foreign Contribution Regulation Act) अंतर्गत मिळालेल्या परवान्यांच्या प्रतीही मागविण्यात आल्या आहेत.
झारसुगुडा पोलिसांच्या नोटीसमध्ये गंभीर आरोपांचाही उल्लेख आहे. त्यात २०११ मध्ये वादग्रस्त इस्लामी प्रवचक झाकिर नाईक याच्याकडून देणगी स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच २००५-०६ दरम्यान चीन सरकारकडून ३ लाख अमेरिकन डॉलर फाउंडेशनला मिळाल्याचे म्हटले आहे. याशिवाय यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान सहायता निधी आणि अर्थ मंत्रालयाकडून फाउंडेशनला निधी वळविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांबाबत फाउंडेशनकडून स्पष्टीकरण व निधीचा उपयोग कशासाठी केला गेला याचा तपशील पोलिसांनी मागितला आहे. यामुळे राजीव गांधी फाउंडेशनभोवतीचे राजकीय वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
Rajiv Gandhi Foundation seeks account of foreign donations, Odisha Police takes action
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा