विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) दाखल आरोपपत्राची दखल घेण्यास निकार दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात ईडीला चांगलेच फटकारले आहे. Rahul – Sonia Gandhi
मनी लाँड्रिंग आणि त्यासंबंधीची चौकशी हे तोपर्यंत ग्राह्य धरले जाऊ शकत नाही जोपर्यंत नियमानुसार फौजदारी गुन्ह्याचा एफआयआर दाखल होत नाही. पीएमएलए (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट) च्या नियमानुसार ईडीने तपास सुरु करण्यापूर्वी संबंधीत गुन्ह्यात एफआयआर दाखल असणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांची आई तथा काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंगचे आरोप होत आहेत. या प्रकरणी आज न्यायालयाने ईडीला स्पष्ट सुनावले आहे. ज्या एफआयआरनुसार मनी लाँड्रिंगच्या आरोपांचा तपास होणार होता, तो एफआयआरच आतापर्यंत नोंद झालेला नाही. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आतापर्यंत या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे. दुसरीकडे ईडीने विना एफआयआर दाखल करत ईसीआयआर दाखल करत तपास पुढे सुरु केला. हे कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
एफआयआर अभावी मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीच नाही तर त्याची तक्रार घेणेही चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरुन मनी लाँड्रिंग प्रकरणाची दखल घेणे देखील कायदेशीर नाही, हे अस्वीकार्य आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, हा आदेश आरोपांच्या मेरिट्सच्या आधारावर नाही. सध्या या प्रकरणात आरोपांमधील तथ्य किंवा खोटेपणा यावर कोर्ट काहीही टिप्पणी करत नाही, मात्र कायदेशीर प्रक्रियांचे पालन झालेले नाही. कायदेशीर प्रक्रियांच्या वैधतेसंबंधी हा निर्णय आहे. या आदेशासोबतच राऊज अव्हेन्यू कोर्टाने ईडीकडून दाखल प्रकरण, त्यांची तक्रार रद्दबातल ठरवत त्यांच्या आरोपपत्राची (चार्जशीट) दखल घेण्यास नकार दिला.
Relief for Rahul – Sonia Gandhi in National Herald case, court reprimands ED
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप