विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या सुरक्षेसमोर उभे ठाकलेले धोके केवळ सीमारेषेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते बहुआयामी झाले आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी स्पष्ट केले की, देशासमोर सहा प्रमुख धोके मांडले आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी आधुनिक दृष्टिकोन आवश्यक असल्यावर भर दिला आहे. General Anil Chauhan
चौहान यांनी सांगितले की, पहिला आणि सर्वात मोठा धोका म्हणजे चीनसोबतचा सीमावाद. लडाखपासून अरुणाचलपर्यंत तणाव कायम असून, पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) सतत आपली लष्करी ताकद वाढवते आहे. दुसरा धोका म्हणजे पाकिस्तानकडून चालवला जाणारा ‘ब्लीडिंग इंडिया’ तंत्र. दहशतवाद, घुसखोरी आणि सीमापार हल्ल्यांमुळे देशाला सतत अलर्ट मोडवर राहणे भाग आहे.
तिसरा धोका सायबर हल्ले आहेत. सायबर हॅकिंगद्वारे महत्त्वाची सरकारी यंत्रणा, बँकिंग क्षेत्र आणि संरक्षण मंत्रालयाच्या नेटवर्कवर आघात करण्याचे प्रयत्न शत्रूराष्ट्रांकडून वाढले आहेत. चौथा धोका म्हणजे अंतराळ क्षेत्रातील स्पर्धा. उपग्रहांचे संरक्षण, स्पेस डेब्रीस आणि शत्रूंची स्पेस मिलिटरी क्षमता भारतासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
पाचवा धोका ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखी उदयोन्मुख तंत्रज्ञान आहे. या साधनांचा वापर करून लहान गट मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकतात. सहावा धोका म्हणजे अंतर्गत असुरक्षा आणि हायब्रिड वॉरफेअर. सोशल मीडियाद्वारे अफवा, द्वेष पसरवून समाजात असंतोष निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत.
सीडीएस म्हणाले, “भारताने पारंपरिक युद्धासोबतच अपारंपरिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. सैन्यदलांचे आधुनिकीकरण, तंत्रज्ञानात गुंतवणूक आणि नागरी-सैन्य सहकार्य ही काळाची गरज आहे.”
तज्ज्ञांच्या मते, चौहान यांचे हे भाषण भारताच्या सुरक्षा धोरणासाठी ‘रोडमॅप’ ठरू शकते. कारण, भारताला पुढील दशकात सीमारेषेवरच नव्हे तर डिजिटल व तांत्रिक रणांगणावरही आपली ताकद दाखवावी लागणार आहे.
Six major threats to India’s security, General Anil Chauhan’s clarification
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा