विशेष प्रतिनिधी
काठमांडू: नेपाळचे खासदार धवल शमशेर राणा यांनी नेपाळला धर्मनिरपेक्ष घोषित करण्यासाठी आणि धर्मांतरासाठी 100 दशलक्ष डॉलर्सची अमेरिकी निधी मिळाल्याचा दावा केला आहे. घटनात्मक हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळचा दर्जा रद्द करून धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यामागे अमेरिकन फंडिंगबाबत चौकशी करण्याची मागणी रविवारी राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे खासदार धवल शमशेर राणा रविवारी सभागृहात केली. Nepal
नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून नष्ट करण्यासाठी आणि त्याचे धर्मांतर करण्यासाठी अमेरिकेकडून १०० दशलक्ष डॉलर्सचा निधी असल्याचा दावा धवल शमशेर राणा यांनी केला आहे. ते म्हणाले, अमेरिकन फंडिंगमधून कोणत्या नेत्यांना पैसे मिळाले याचे सत्य देश आणि जगासमोर आले पाहिजे. नेपाळमधील जनआंदोलनात हिंदू राष्ट्र रद्द करून त्याला धर्मनिरपेक्ष देश घोषित करण्याची मागणी कधीच झाली नव्हती. देशातील राजेशाही संपल्यानंतर काही प्रमुख पक्षांच्या डझनभर नेत्यांनी अंतरिम राज्यघटना जाहीर केली होती, ज्यामध्ये नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केले होते. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना शिक्षा करण्याची मागणी खासदार राणा यांनी सरकारकडे केली आहे.
जगभरातील हिंदू समुदायातील लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करताना नेपाळमध्ये धर्मांतरासाठी अमेरिकेतून निधी आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते, मनमोहन सरकारच्या काळात अमेरिकेतून 14 अब्ज रुपये आले होते. त्यांनी आरोप केला की आतापर्यंत धर्मांतरासाठी 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्च झाले आहेत. खासदारांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.
राणा यांनी सांगितले की, नेपाळमध्ये झालेल्या जनआंदोलनात कधीही हिंदू राष्ट्र संपवून धर्मनिरपेक्ष देश घोषित करण्याची मागणी झाली नव्हती. त्यांनी सरकारकडे न्यायिक चौकशी करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. राणा यांनी नेपाळची ओळख जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून असल्याचे सांगितले. त्यांनी धर्मनिरपेक्षता रद्द करून पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी संसदेत केली आहे.
धवल शमशेर राणा यांनी नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी आंदोलन सुरू करण्याचे जाहीर केले आहे. हे आंदोलन पुढील महिन्यापासून सुरू होणार असून, त्याला आतापर्यंत लाखो लोकांचे समर्थन मिळाले आहे. त्यासाठी ते भारताशीही संपर्क साधणार आहेत. सध्या त्यांनी जगभरातील हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
US funds $100 million to declare Nepal secular, Nepal MP alleges