विशेष प्रतिनिधी
काठमांडू : नेपाळमधील निदर्शनांमध्ये 20 जणांचा मृत्यू हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा सादर केला आहे.
राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक जखमी झाले आहेत. भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात मोठ्या संख्येने जनरेशन-झेड (१८ ते २८ वर्षे) निदर्शने करत आहेत.
सोमवारी सकाळी १२ हजारांहून अधिक निदर्शक संसद भवन संकुलात घुसले. त्यानंतर सुरक्षा दलांनी अनेक राउंड गोळीबार केला. काठमांडू प्रशासनाने तोडफोड करणाऱ्यांवर दिसताच क्षणी गोळीबार करण्याचे आदेशही दिले.
संसद भवन, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाभोवती कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे, केपी ओली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवण्यास स्पष्ट नकार दिला.
३ सप्टेंबर रोजी नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबसह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
या प्लॅटफॉर्मनी नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी केलेली नव्हती. मंत्रालयाने २८ ऑगस्टपासून सात दिवसांची मुदत दिली होती, जी २ सप्टेंबर रोजी संपली.
Youth angered by social media ban, 20 killed in protests in Nepal
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा