विशेष प्रतिनिधी
मुंबई : IPS Police राज्य पोलीस दलातील 11 आयपीएस पोलीस अधिकार्यांच्या गृहविभागाने बढती देऊन बदल्या केल्या आहेत. पाच पोलीस अधिकार्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आली आहे. काहींना त्याच ठिकाणी बदली दाखविण्यात आली आहे.IPS Police
शुक्रवारी गृहविभागाने अकरा आयपीएस पोलीस अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले होते. या अकरापैकी पाच पोलीस अधिकार्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आलेल्यांमध्ये राज्याच्या सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे यांची त्याच विभागातील रिक्तपदी, नागरी हक्क संरक्षण विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची राज्याच्या कारागृह व सुधारसेवा विभागात, राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांची विशेष अभियान विभागात, राज्याच्या आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम मल्लिकार्जुन यांची राज्याच्या प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांची राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभाग, महामार्ग सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरेश मेखला यांची मुंबईख्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली दाखविण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस बलाचे पोलीस उपमहानिरीक्षक राजीव जैन यांची विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बढती देताना त्याचठिकाणी, तर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक भगवान त्रिमुखे यांचीही तिथे बदली दाखविण्यात आली आहे.
गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्रेणिक लोढा यांची बुलढाणाच्या खामगावात बदली करण्यात आली आहे. दुसरीकडे बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या मनोजकुमार शर्मा यांची राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, पुण्याच्या राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक आर. बी डहाळे यांची पुण्याच्या राज्य गुन्हे अभिलेख केंद्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, तर पुण्याच्या राज्य राखीव पोलीस बलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे यांची पुण्याच्या मोटार परिवहन विभागात बदली करण्यात आली आहे.
11 IPS Police Officers in State Police Force promoted
महत्वाच्या बातम्या
- स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपीला फासावर लटकावणार, एकनाथ शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया
- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या गुणाट गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
- मुंबईतील डिफेन्स क्लबमध्ये ७८ कोटींचा घोटाळा!
- सिल्लोडमध्ये बांग्लादेशी रोहिग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप