विशेष प्रतिनिधी
मुंबई: लाडक्या बहिणी सुरक्षित राहाव्या हीच सरकारची भूमिका आहे. आरोपीचे कुणाशीही संबंध असले तरी त्याची गय केली जाणार नाही. स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपीला फासावर लटकवणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde ) यांनी दिली. Swargate rape
शिंदे म्हणाले, पुण्यातील घटना अतिशय दुर्दैवी असून आपल्या लाडक्या बहिणीसोबत निंदनीय प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यात लक्ष घालून आहेत. मी स्वत: याबाबत पुणे पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. आरोपीचे सर्व लागेबांधे पोलिसांच्या हाती आले असून त्याला तात्काळ अटक होईल.
शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींना एसटीमध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा म्हणून त्यांना ५० टक्के सवलत दिली. परंतू, अशा प्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल. ज्या आगारात बंद पडलेल्या एसटी आहेत त्या सर्व गाड्या तात्काळ लिलावात काढाव्या, अशा सूचना दिल्या आहेत. तिथल्या सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नसून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल.
पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकावर एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केलं असून त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेले २३ सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Swargate rape accused will be hanged, Eknath Shinde’s angry reaction
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…