Ashok Kharat : करीअर मार्गदर्शनासाठी गेलेल्या तरुणीवर अशाेक खरातचा चार वेळा बलात्कार

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Ashok Kharat  करीअरचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेलेल्या तरुणीवर भाेंदूबाबा अशाेक खरात याने चार वेळा बलात्कार केल्याची फिर्याद एका तरुणीने दाखल केली आहे. तांब्याच्या भांड्यातून पाजलेल्या पाण्यात गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचे या तरुणीने म्हटले आहे.Ashok Kharat

अशोक खरातविरोधात पीडित तरुणीने एफआयआर दाखल केली आहे. जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान अशोक खरातने चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा, म्हणत पीडित तरुणीचे कुटुंब अशोक खरातकडे गेले होते. तिसऱ्या भेटीत मुलीनं कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, अशी विचारणा कुटुंबीयांकडून करण्यात आली.Ashok Kharat



दोन वर्षे घर बांधू नका असे सांगत कुटुंबाला पुन्हा बोलावून अशोक खरात घेत होता. कुठल्या फिल्ड मध्ये शिक्षण घेऊ,चांगली नोकरी कुठे लागेल असा प्रश्न तरूणीने करताच खरातने तिच्या आई-वडीलांना केबीन बाहेर काढले. मला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्यायला दिले. ते पाणी थोडे बेचव लागले. त्यानंतर त्याने काहीतरी मंत्र बोलून तो ग्लास माझ्या डोक्यावर ठेवून मला डोळे बंद करायला सांगितले. तो बोलेल त्याप्रमाणे मंत्र म्हणायला लावले. त्यानंतर ताे माझ्या पाठीमागे येवून उभे राहीला. त्यानंतर आपोआप माझे डोके जड पडू लागले. मी तो सांगेल त्याप्रमाणे वागू लागले. त्यावेळी पहिले त्याने मला त्याच्या मिठीत घेतले आणि माझ्या डोक्यावरून, छातीवरून हात फिरवला. मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझे खुप चांगले करीयर घडवील. फक्त मी सांगतो त्याप्रमाणे तु कर असे सांगत मंत्र म्हणायला लावले. नंतर माझे लैंगिक शोषण केले. मी विरोध केला तर त्याने धमकी दिली तु जर मला विरोध केला आणि जर कोणाला काही सांगितले तर मी माझ्याकडील दैवी शक्तीने तुझे आणि तुझ्या घरच्यांचे आयुष्य उध्वस्त करून टाकीन. तुझ्या वडिलांचा लवकरच मृत्यु होईल अशी भीती घातली. त्यामुळे मी घाबरून तो सांगेल त्याप्रमाणे वागले, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान वारंवार अशोक खरात अत्याचार करत होता. अशोक खरातच्या दबावामुळेच त्याचा ऑफीस बॉय नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल केल्याचे तरुणीने सांगितले. पीडित तरुणीने याप्रकरणी शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. आता अशोक खरातचे नवीन कारनामे समोर आल्यानंतर पीडितेने काल पुन्हा नव्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

A young woman who went for career guidance was raped four times by a man of such rank

महत्वाच्या बातम्या