विशेष प्रतिनिधी
जिल्हा निवडणूक आयोगाने विद्यमान मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सत्तार यांची उमेदवारी राहणार की रद्द होणार? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या चौकशीत सत्तार दोषी आढळल्यास सिल्लोडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रात 16 चुकी असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर जिल्हा निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात मालमत्तेची लपवालपवी केली आहे. प्रत्यक्षातील मालमत्ता आणि शपथपत्रात दाखवण्यात आलेली मालमत्ता याच्या तपशीलात तफावत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच या मालमत्तेवर जे बांधकाम करण्यात आलं आहे, त्याचीही योग्य माहिती देण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. सत्तार यांनी चारचाकी वाहन असल्याचं शपथपत्रात नमूद केलं आहे. पण हे वाहन कधी खरेदी केलं त्याची तारीखच दिली नाही. याशिवाय सत्तार यांची जालन्यात मालमत्ता आहे, त्याचा तपशीलही दडवण्यात आल्याचा आरोप या शपथपत्रात करण्यात आला आहे.
सत्तार यांनी आपल्या मालमत्तेत ज्वेलरी, वाहने, मालमत्ता याच्यासह विविध सहकारी संस्थांमधील शेअर्सची माहितीही चुकीची देण्यात आली आहे. सत्तार यांनी शपथपत्रात अनेक माहिती दिलेली नाही, दिलेली माहिती एक तर चुकीची आहे आणि अर्धवट आहे. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली होती. त्याची निवडणूक आयोगाने गंभरी दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Abdul Sattar’s Candidacy at Risk as Election Commission Orders Inquiry into Affidavit
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देशात अराजकता पसरविण्याचा राहुल गांधी यांचा डाव, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- Manoj jarange : संपूर्ण महाराष्ट्र हादरवण्याच्या जरांगेंच्या गर्जना; प्रत्यक्ष लढण्यात आणि पाडण्यात आपला “निवडक” मराठवाडाच बरा!!
- Manoj Jarange : मनाेज जरांगे यांच्या ताेंडी महाविकास आघाडीची भाषा
- पाठीमागे अदृश्य शक्ती, आमचं ठरलंय ..राम सातपुते यांच्या दाव्याने उत्तम जानकर