Supriya Sule : भुजबळ, मलिक, संजय राऊत यांच्यावर कारवाई मग वाल्मिक कराडला नोटीस येऊन देखील कारवाई का नाही ? सुप्रिया सुळे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा :Supriya Sule  छगन भुजबळ, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर ईडीने किती जोरात कारवाई केली पण वाल्मिक कराडला नोटीस येऊन देखील कारवाई का नाही झाली? त्यांच्यावर मोक्का का नाही लावण्यात आला ? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या,Supriya Sule

परभणी आणि बीड या दोन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी या घटना देशासमोर पोहोचवल्या. परभणी आणि बीडच्या घटनेत राजकारण कोणीही करू नये अशी सर्वांना विनंती आहे



अजूनही एक खुनी फरार आहे, ईडीची कारवाई वाल्मिक कराडवर झाली त्यावर कुठलीच कारवाई होताना का दिसत नाही ? छगन भुजबळ, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर ईडीने किती जोरात कारवाई केली पण वाल्मिक कराडला नोटीस येऊन देखील कारवाई का नाही झाली? त्यांच्यावर मोक्का का नाही लावण्यात आला ? असा सवाल करून खासदार सुळे म्हणाल्या, बीड आणि परभणीच्या घटनेनंतर महाराष्ट्राच्या लोकांची चेष्टा लावली आहे का ? वाल्मिक कराड शरण येतो के काय?जोपर्यंत दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही

कुठलाही जिल्हा कुठल्याही व्यक्तीमुळे बदनाम होत नाही तर कृतीमुळे बदनाम होतो , असे सांगून त्या म्हणाल्या, वाल्मिक कराडांची जी कृती आहे आणि काम करण्याची पद्धत आहे ती तुमच्या चॅनलवरून आम्हाला माहित पडली . वाल्मिक कराड आणि त्यांच्यासोबत जी कोणी कोणी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे . ज्यांनी ज्यांनी ही हत्या केली असेल त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे

ठाकरे गटाने एक ला चलो चा नारा दिला आहे. यावर सुळे म्हणाल्या, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जेव्हा एकत्र होते तेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका या स्वतंत्र लढल्या गेल्या होत्या. यात नवीन काय? त्यांनी केलं तर चालतं आणि आम्ही केला तर गुन्हा हा कुठला न्याय आहे ?

Action is taken against Bhujbal, Malik, Sanjay Raut, why is there no action even after Valmik Karad has received a notice? Question by Supriya Sule

महत्वाच्या बातम्या