विशेष प्रतिनिधी
बीड: Dhananjay Munde संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी काल बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा मध्ये नागरिकांसह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाषण केले. एकेरी उल्लेख केल्याने धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.Dhananjay Munde
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल बीड येथील मोर्चात भाषण केले. त्यानंतर त्यांच्या भाषणाचा एक व्हॉट्सअॅप चॅट सगळीकडे वायरल झाले. यात एकेरी शब्दात अजित पवार, धनंजय मुंडे यांचा उच्चार करण्यात आला होता. याचा तीव्र निषेध करण्यासाठी धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
त्याबरोबरच दलित समाज बांधवांबाबत जितेंद्र आव्हाड यांचे जे व्हॉट्सअॅप चॅट वायरल झाले. त्याबद्दल आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Activists of Dhananjay Munde are aggressive against MLA Jitendra Awad in Beed
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट