विशेष प्रतिनिधी
मुंबई : मी गेली अनेक वर्ष माझ्या भाषणांमधून ही गोष्ट महाराष्ट्राला सांगवत आहे की आपल्याकडच्या जमिनी वाचवा. जमीन हे आपले अस्तित्व आहे, अनेक ठिकाणांच्या जमिनींचा हा विषय आहे. महाराष्ट्रातील अनेक जमिनींचा हा विषय आहे, फक्त कोकणातील जमिनींचा नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. Raj Thackeray
दशावतार’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. दशावतार चित्रपट पाहिल्यावर त्यावर अभिप्राय देताना राज ठाकरे म्हणाले, दशावतार सिनेमातून गंभीर प्रश्नाला हात घालण्यात आला आहे, मी गेली अनेक वर्ष माझ्या भाषणांमधून ही गोष्ट महाराष्ट्राला सांगवत आहे की आपल्याकडच्या जमिनी वाचवा. जमीन हे आपले अस्तित्व आहे, अनेक ठिकाणांच्या जमिनींचा हा विषय आहे. महाराष्ट्रातील अनेक जमिनींचा हा विषय आहे, फक्त कोकणातील जमिनींचा नाही.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, सुबोधने हा विषय अत्यंत चलाखीने मांडला आहे, दशावताराच्या रुपात ते मांडले असून अत्यंत उत्कृष्ट छायाचित्र, संगीत आहे. दिलीप प्रभावळकर यांनी अत्यंत चांगले काम केले आहे, मला वाटते हे अत्यंत छोटे वाक्य आहे. कारण, ते खूप मोठे आहेत आणि त्यांनी उत्तम काम केले आहे. बाकीच्या कलाकारांनी, महेश मांजरेकर यांनीही साजेशे काम केले, प्रियदर्शनी यांनीही चांगले काम केले. एकंदरीत हा चित्रपट एंटरटेनमेंट आहे, पण महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर विषयाला त्यांनी हात घातला आहे, त्यामुळे नक्की हा सिनेमा पाहायला हवा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.
झी स्टुडिओजचा ‘दशावतार’ हा भव्य मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून, चित्रपटगृहांमध्ये गर्दी दिसून येत आहे. चित्रपट समीक्षक, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि प्रेक्षक या सर्वांकडून ‘दशावतार’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल 5 कोटी 22 लाख रुपयांची कमाई करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
after watching Dashavatar, Raj Thackeray said
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा