Ajit Pawar : वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अजित पवार यांनी केली सुजय विखेंची कानउघाडणी

Ajit Pawar : वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अजित पवार यांनी केली सुजय विखेंची कानउघाडणी

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

Ajit Pawar माजी मंत्री बाळासाहेब थाेरात यांच्या कन्येबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. लाेकसभा निवडणुकांत या प्रकारच्या वक्तव्यांचा फटका बसला हाेता, असेही त्यांनी सांगितले. Ajit Pawar

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपाचे नेते वसंत देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थाेरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले आहे. या प्रकरणानंतर धांदरफळ आणि परिसरात दोन्ही गटात हाणामारी तोडफोड झाली आहे.दरम्यान या प्रकरणानंतर अजितदादा पवार यांनी सुजय विखे पाटील यांना फोन केला आहे. अजित पवार यांनी सुजय विखे पाटील यांची चांगलीच कान उघाडणी केल्याचे सांगण्यात येत आहे.



दग्रस्त विधाने करुन महायुतीला अडचणीत आणू नये असे अजितदादा पवार यांनी फोन करुन सुजय विखे यांना सांगितल्याचे समजते. लोकसभा निवडणूकांच्या वेळी महायुतीतील नेत्यांनी अशाच प्रकाराची वादग्रस्त विधाने केली होती. त्याचा फटाका नंतर मतदानात बसला होता. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य टाळावीत अशी कानउघाडणी अजित पवार यांनी केल्याचे समजते.संगमनेरमधील राजकीय पार्श्वभूमीवर, आमदारकीच्या उमेदवारीसाठी उत्सुक असलेल्या सुजय विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात जयश्री थोरातांना उत्तर देताना भाजपचे कार्यकर्ते वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात आणि एकूणच थोरात कुटुंबावर टीका केली.

त्यासोबतच त्यांनी जयश्री थोरातांना लक्ष्य करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.या वक्तव्यानंतर धांदरफळमधील त्या सभेतच मोठा गोंधळ पहायला मिळाला. वसंत देशमुख यांच्या अश्लाघ्य विधानानंतर काँग्रेसच्या स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्या सभास्थळी दाखल झाल्या.या महिला कार्यकर्त्या थेट स्टेजवर चढल्या आणि त्यांनी ठिय्या माडंत वसंत देशमुखांकडून करण्यात आलेल्या अपमानास्पद विधानाबाबत माफीची मागणी लावून धरली.काय म्हणाले हाेते वसंतराव देशमुखभाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही.

तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वसंतराव देशमुख म्हणाले हाेते.

Ajit Pawar Criticizes Sujay Vikhe Over Controversial Statements

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023