विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या एका कार्यक्रमात दिवंगत अजित पवार यांचा फोटो नसल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर नाराजी व्यक्त करत पक्षाचे नेते अमाेर मिटकरी यांनी बॅनर पेक्षा आमच्या काळजात कायम असे म्हटले आहे. Amol Mitkari
राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटानेही या प्रकरणी टीकेची झोड उठवत पटेल यांच्या कथित कृतघ्नपणाचा निषेध केला आहे. या कृतीद्वारे प्रफुल्ल पटेल यांचे पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसत आहेत, असे शरद पवार गटाने म्हटले आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एका पोस्टद्वारे म्हणाले, आदरणीय अजितदादा तुम्ही कुण्या बॅनरवर नसला काय असला काय? प्रसिद्धीचा तुम्हाला हव्यास होताच कुठे? तुम्ही मात्र गरिबांच्या घराघरात कायम आहात.. कोकण ते विदर्भापर्यंत तुमचा चाहता वर्ग विखुरलाय ..कदाचित तो तुम्हाला भेटलाही नसेल आयुष्यात कधी…. किंवा त्याला तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नसेल.
मात्र तो फाटका असला तरी देवासमान पुजतो तुम्हाला … कारण तो जाणत होता की तुम्ही महाराष्ट्राची गरज होता….तो फाटका, गरीब, पिचलेला, रडतोय आजही तुमच्यासाठी धाय मोकलून… कदाचित तुम्ही त्याला दिसणार नाही, आणि तो ही आता परत हसणार नाही… तुम्ही व तुमचे फोटो कायमचे कोरून गेलेत त्याच्या काळजात… तुम्ही बॅनर वर नसलात म्हणून काय झालं?? एकदिवस अबाल वृद्ध इथला डोंगर हलवतील ,आणी स्वाभिमानाने म्हणतील “आमच्याकडे बॅनर छापायला पैसे नसतील पण दादा तुमच्या बॅनर पेक्षा आमच्या काळजात कायम दिसतील.. तुमच बॅनर उद्या खतावर ,छतावर राहील ,पण आमच्या काळजातलं दादा आम्ही सरणावर जाईस्तो आमच्या फाटक्या हृदयात कायम राहील. घराघरात दादा मनामनात दादा, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यातच सुनील तटकरे यांच्या रायगड येथील एका कार्यक्रमातील बॅनरवर अजित पवारांचा फोटो नव्हता. त्यामुळे शरद पवार गटाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता असाच काहीसा प्रकार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत घडला आहे. त्यांच्याही कार्यक्रमात अजित पवार यांचा फोटो नसल्याचे निदर्शनास आले आहे.
शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, रायगड मध्ये तटकरेंना जशी अजितदादांची अडचण तशीच आता पटेलांच्या विदर्भात तिरोडा येथील NCP पक्षाच्या अधिकृत बैठकीतील बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नाहीच. फक्त स्वतःचे फोटो लावणाऱ्या पटेल तटकरे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिले की आम्ही तुमचे नसून स्वतंत्र आहोत. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसत आहेत.
प्रफुल्ल पटेल साहेब तुमच्या कृतघ्नपणाचा निषेध ! मात्र स्वतःला अजितदादा प्रेमी म्हणवणारे त्यांच्या पक्षातील आमदार व पक्ष पदाधिकारी गप्प बसत असतील तर ते गुलाम असावेत किंवा ढोंगी असावेत, असे लवांडे यांनी म्हटले आहे.
Ajitdada is missing from Praful Patel’s banner too, Mitkari said he will always be in our hearts!
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर