एक दिवसासाठी कायदा बदला, अशोक खरातला सुया टोचून टोचून मारा, सुधीर मुनगंटीवार यांचा संताप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भोंदूबाबांविरोधात एक दिवसासाठी कायदा बदलून त्यांना ‘सुया टोचून टोचून मारण्याची’ शिक्षा दिली पाहिजे, असा संताप माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशोक खरात याचविरोधात व्यक्त केला आहे.

हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे,” असे म्हणत मुनगंटीवार म्हणाले, मी कायद्यावर विश्वास ठेवणारा एक सुजाण नागरिक आहे, पण जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून मी अशोक खरातचे अघोरी कारनामे पाहतो आणि ऐकतो, तेव्हा माझ्यासारख्या माणसाच्याही मनात येते की याला कायद्याची कोणतीही सवलत मिळू नये. ‘नो कोर्ट, नो कचेरी’; याला फक्त भर चौकात सुया टोचून फासावर लटकवले पाहिजे.



२१ व्या शतकात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांचे शिक्षण शाळांमधून देतो. मात्र, अशा प्रकारचे भोंदू बाबा समाजाला तर त्रास देतातच, पण हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचे काम करत आहेत, अशी खंत व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, जिथे स्त्रीला देवाच्या बाजूचे स्थान दिले जाते. मात्र, या भोंदू बाबाने स्त्रियांचा अवमान करून प्रत्यक्ष देवाचा आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी देशातील सर्व भोंदू बाबांना निरोप गेला पाहिजे की—’याद रखो तुम्हारी मौत पक्की है!

स्वतःला अंकशास्त्र आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणवून घेणारा अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर सिन्नरच्या मिरगाव येथे ‘श्री ईशान्येश्वर मंदिर’ संस्थानच्या आडून आपले काळे साम्राज्य चालवत होता. एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

Ashok Kharat to death with needles,” Sudhir Mungantiwar fumes in anger

महत्वाच्या बातम्या