विशेष प्रतिनिधी
पुणे : Ashwini Kedari महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत 2023 मध्ये राज्यातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या अश्विनी केदारी (Ashwini Kedari) हिचा गरम पाणी अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
अश्विनी केदारी (Ashwini Kedari) ही दहा दिवसांपूर्वी घरातील बाथरूममध्ये हीटरमुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली होती. गरम पाणी अंगावर सांडल्यामुळे तिच्या शरीराचा सुमारे 80 टक्के भाग भाजला होता. या गंभीर जखमा असूनही तिने मृत्यूसोबत दहा दिवस संघर्ष केला; मात्र अखेरीस तिचा मृत्यू झाला.
अश्विनी (Ashwini Kedari) ही खेड तालुक्यातील पालू येथील एका शेतकरी कुटुंबातील मुलगी होती. लहानपणापासूनच अभ्यासू, मेहनती आणि चिकाटीची असलेली अश्विनी केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमातही अग्रेसर होती. त्यामुळे ती आपल्या गावातीलच नव्हे तर जिल्ह्यातील तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरली होती.
केदारी कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या (Ashwini Kedari) यशाचा आनंद उपभोगण्याआधीच तिच्या जाण्याने कुटुंबीय आणि नातेवाईक शोकाकुल झाले आहेत.
अश्विनीने पीएसआय परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावताना सर्वांना अभिमान वाटावा असे यश मिळवले होते. तिच्या दुर्दैवी निधनामुळे स्वप्न अधुरे राहिल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Ashwini Kedari, who came first among girls in the state in the PSI exam, dies tragically
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा