विशेष प्रतिनिधी
नागपूर : Bageshwar Baba छत्रपती शिवाजी महाराज हे माझे प्रेरणास्थान असून स्वप्नातही त्यांचा अवमान मी करू शकत नाही. संत, महापुरुषांविषयीची ते कसे समर्पित होते. त्यांची आदर भावना कशी होती, हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. यात कुठेही अवमान नव्हता. मात्र जाणीवपूर्वक आपल्या वक्तव्याचा अनर्थ केला गेला. पण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, अशा शब्दांत बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी माफी मागितलीBageshwar Baba
नागपुरातील रेशीमबागेत आजपासून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेला सुरुवात होण्यापूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सोशल मीडियावरून बदनाम करण्यात आले. मुळात ज्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून आपण हिंदुराष्ट्राची कल्पना पुढे नेली. आज प्रत्येक सनातनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे जिवंत आहे, असे त्यांनी सांगितले.Bageshwar Baba
बागेश्वर बाबा हे नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा किस्सा सांगताना म्हणाले की, ‘शिवाजी महाराजांनी युद्धात थकवा जाणवल्यानंतर समर्थ रामदास स्वामींच्या चरणी मुकुट ठेवला आणि राज्यकारभार सोपवण्याची विनंती’ केल्याची कथा सांगितली. मात्र बागेश्वर बाबांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, ते सर्व आपलेच लोक आहेत. जर आपण आपसात भांडत राहिलो तर इतराना संधी मिळेल. त्यामुळे पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना माझ्या मनात दुसरा काहीही विचार नव्हता. गुरुंप्रती शिवाजी महाराजांचा भाव काय होता, संतांच्या प्रती त्यांचा भाव काय होता ते मी माझ्या भाषेत सांगितलं. पण काही लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला. पण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी जगतो. आम्ही हिंदुत्वाची जी विचारधारा स्वीकारली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच. त्यामुळे त्यांचा अवमान होईल, असं काही वक्तव्य करणे याचा स्वप्नातही मी विचार करू शकणार नाही.
प्रत्येकाना चार मुलांना जन्म द्या आणि त्यातील एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या. या वक्व्यावरही स्पष्टीकरण देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, “मी एका मुलाला संघाला द्या असं म्हटलं होतं. त्याचा अर्थ एक मुलगा राष्ट्रकार्य करण्यासाठी आणि राष्ट्रसेवेसाठी द्या. त्या मुलाला कलेक्टर बनवा, सैन्यात किंवा पोलिसात पाठवा. परंतु त्याला कट्टर सनातनी विचारांचा बनवा, असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका, असे त्यांनी आवाहन केले.
Bageshwar Baba apologises over remarks on Chhatrapati Shivaji Maharaj
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल