विशेष प्रतिनिधी
पुणे : नाशिकमधील भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्याबाबत एक धक्कादायक आर्थिक खुलासा समोर आला असून, त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर पुण्यात मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे, ही मालमत्ता संशयास्पद आर्थिक व्यवहारातून उभी करण्यात आल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. Ashok Kharat
अधिक ची माहिती अशी की, पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील ‘२४ रत्नम’ या उच्चभ्रू आणि आलिशान सोसायटीमध्ये अशोक खरातच्या मुलीच्या नावावर एक ३ BHK फ्लॅट खरेदी करण्यात आला आहे. सुमारे १०५५ चौरस फुटांचा हा फ्लॅट सातव्या मजल्यावर असून, या व्यवहाराची नोंद १३ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
या फ्लॅटसाठी तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आला असून, विशेष म्हणजे हा संपूर्ण व्यवहार रोख रकमेने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार झाल्यामुळे या प्रकरणावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यामागे पुण्यातील एका बड्या राजकीय नेत्याची मदत मिळाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित नेत्याचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सीए च्या नावावर बंगला
याचबरोबर, अशोक खरातच्या मालमत्तेचा विस्तार केवळ एका फ्लॅटपुरता मर्यादित नसून, कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागातही त्याची मोठी गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे. चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे यांच्या माध्यमातून कोरेगाव पार्क परिसरात तब्बल १८ रो-हाऊस आणि ४९ गुंठे जमीन खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. या व्यवहारांचीही सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Big scam in Pune over Bhondubaba Ashok Kharat’s property
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर