नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणात पवन यादवच्या भावावर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

मुंबई: अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृतीयपंथी पवन यादवच्या भावावर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृतीयपंथीच्या तक्रारीवरून कफ परेड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनामध्ये (FDA) मध्ये नोकरी लाव नाहीतर व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी पवनला देण्यात आली होती. हा व्हिडिओ मूळ स्वरूपात नसून तो छेडछाड केलेला असून व्हायरल करण्यात आल्याचाही दावा यावेळी करण्यात आला आहे.



कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. कफ परेड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 79 आणि 351(1) सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

झिरवाळ यांचा तृथीयपंथीय पवन यादव या व्यक्तीसोबत व्हिडिओ चर्चेत आला. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. व्हायरल व्हिडिओवरून विरोधकांनी मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण, व्हायरल व्हिडिओ दोन-तीन व्हिडिओ जोडून तयार करण्यात आल्याचा आरोप मंत्री नरहळी झिरवाळ यांनी केला.

त्यामुळे, नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हिडिओ खरा आहे की खोटा? याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना या प्रकरणाची चौकशी करू आणि त्यानंतर कारवाई करू, असे म्हटले होते.

Case Filed Against Pawan Yadav’s Brother Over Viral Video of Narhari Zirwal

महत्वाच्या बातम्या