विशेष प्रतिनिधी
सोलापूर: महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी सोलापूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांचे जन्मोत्सव येथे मोठ्या जल्लोषात साजरे होतात. मात्र, यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर प्रशासन आणि जयंती उत्सव समिती यांच्यात ‘साऊंड सिस्टम’वरून मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत. Solapur
काय आहे नेमका वाद?
गेल्या दोन-तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्यासाठी प्रशासनाने डीजे आणि मोठ्या साऊंड सिस्टमवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने सर्व मंडळांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, “कोणीही साऊंडची बुकिंग करू नये, अन्यथा आर्थिक नुकसानीस स्वतः जबाबदार राहावे लागेल.” प्रशासनाने मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
‘कुणी आडवे आले तर बघून घेऊ’
राजाभाऊ सरोदे यांचा इशारा दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती कृती समितीचे राजाभाऊ सरवदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरताना त्यांनी जाहीर केले की, “यंदाची जयंती तितक्याच जल्लोषात साजरी होणार. सर्व मंडळांनी ‘एक बेस आणि एक टॉप’ लावायचा. जर कोणी आडवे आले, तर त्याला आम्ही बघून घेऊ.”
सरोदे यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य असले, तरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम
प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होऊ दिले जाणार नाही, असे संकेत दिले आहेत. साऊंड बुकिंग करणाऱ्यांवर आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे.
प्रशासनाचा आग्रह आहे की केवळ पारंपरिक वाद्ये वापरा, आवाजाची मर्यादा पाळा, समितीने घेतलेल्या निर्णयात ‘एक बेस, एक टॉप’ लावणारच, उत्सवाच्या उत्साहात तडजोड नाही अस स्पष्ट म्हणणं आहे.
कार्यकर्त्यांची सद्य स्थिती,नेत्यांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.आता मध्यवर्ती जयंती समितीच्या या आक्रमक भूमिकेला प्रशासन कशा प्रकारे चाप लावणार की चर्चेतून सुवर्णमध्य निघणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी काळात सोलापूर पोलीस आणि प्रशासन काय पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Celebration or Confrontation? Tension Mounts in Solapur Over ‘One Base, One Top’ Sound Policy
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर